• Sat. Sep 21st, 2024
शेतकऱ्याची कृतज्ञता! पोराप्रमाणे सांभाळलेल्या गाईचे निधन; बैलगाडीतून अंत्ययात्रा काढत विधीवत अंत्यसंस्कार

पुणे: शेतकऱ्याचे गाय, बैल या पाळीव प्राण्यांशी नेहमीच जिव्हाळ्याचे नाते असल्याचे आपण अनेकदा पाहतो. प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी करणे, त्याचं वर्ष श्राद्ध घालणे असे अनेक प्रकार शेतकरी करताना पहायला मिळतो. अशीच एक घटना भोर तालुक्यातून समोर आली आहे. ब्राम्हणघर गावातील शेतकरी सदाशिव कुमकर यांनी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या गाईची, घरातील सदस्याप्रमाणे तिची अंत्ययात्रा काढली.
प्रकल्पाची घोषणा; मात्र अमंलबजावणी नाही, गाव २३ वर्ष प्रतिक्षेत, आता ग्रामस्थ गुरांसह बसले उपोषणाला
लाडानी वाढवलेली गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून, तिची बैलगाडीतून अंत्ययात्रा काढून, शेतकऱ्यानी कृतज्ञता दाखवली. बैलगाडीच्या पुढे भजन म्हणत गावातील ग्रामस्थही अंत्ययात्रामध्ये सहभागी झाले होते. कुमकर कुटुंबियांच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारांनी आपल्या लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला. शेतकऱ्याचं हे गाईवरच प्रेम पाहून, गावातील नागरिक देखील भारावून गेले होते. भोर तालुक्यातील महुडे परिसरातील ब्राम्हणघर येथील शेतकऱ्याने गाईची अंत्ययात्रा काढून, शेतकऱ्याच्या जीवनात आणि हिंदू धर्मात असलेलं गाईचे महत्व अधोरेखित केले आहे.

माझ्या बापाला १०० क्विंटल कांद्याचे २७५ रुपये मिळाले, आमची किंमत रद्दीपेक्षाही कमी लावली?; कृषीकन्येची हळहळ

हिंदू धर्मात आज ही गोमातेला देवासमान मानले जाते. आजही गोमातेची पूजा करून तिच्या पाया पडण्याची प्रथा आहे. कुमकर या शेतकऱ्याने गोमातेला जीव लावून लहान बाळाचा जसा सांभाळ करतो, तसा तिचा सांभाळ केला होता. त्यांची चौदा ते पंधरा वर्षाची ती गाय गेल्यावर तिचा मालक मोठमोठ्याने रडत होता. गाय गेल्यावर तिला कुठे तरी रानात टाकून दिले जाते. परंतु तसे न करता त्या शेतकऱ्याने गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिची अंत्ययात्रा बैलगाडीतून काढली. बैलगाडीच्या पुढे भजन म्हणत ग्रामस्थ चालले होते. गावातून गाईची अंत्ययात्रा काढून तिचे पावित्र्य जपले गेले असल्याचे दृश्य ब्राम्हणघर येथे पहायला मिळाले. गाईची घरातील सदस्याप्रमाणे अंत्ययात्रा काढून शेतात, गाईला पुरण्यात आले. अतिशय भक्तीमय वातावरणात गायीला निरोप देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed