• Wed. Nov 27th, 2024
    उबाठातील लोक शिवसेनेत येण्यास इच्छुक, येत्या ८ ते १० दिवसात… उदय सामंत यांचं मोठं विधान

    Uday Samant Ratnagiri News : उदय सामंत यांनी पाचव्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषदेत बोलताना विरोधकांना टोला लगावत समाचार घेतला. आमचा अस्त करणारे अस्ताला गेले असल्याचा टोला त्यांनी लगावला.

    Lipi

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : माझा राजकीय गेम करू शकत नाही, त्यांचाच राजकीय गेम कसा होतो हे पुन्हा एकदा जनतेनेच दाखवून दिलं आहे, असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार बाळ माने यांच्यासह नाव न घेता विरोधकांना लगावला आहे. गुहागर मतदारसंघात विजयी झालेले आमदार भास्कर जाधव यांचं अभिनंदन करताना ते म्हणाले की आपल्याला आठवत असेल की, उदय सामंत माझ्या मतदारसंघांमध्ये आला तर मी रत्नागिरीमध्ये येऊन त्याला सोडणार नाही, अशी काहीतरी भाषण मी ऐकली होती. पण त्यांना आता मी न जातासुद्धा काय करू शकतो हे त्यांना आता समजलं असेल, असा सूचक इशारा त्यांनी भास्कर जाधव यांना दिला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघा पाचव्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी आज बुधवारी रत्नागिरीत आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

    आमच्यामध्ये कोणती वैयक्तिक मतभेद नाहीत, पण हे राजकीय तत्वाचे वैर असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केलं. गुहागरमध्ये आम्ही परत एकदा पुन्हा जोमाने काम करू असंही सामंत यांनी म्हटले आहे.
    शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
    आमच्याकडे काय काय चाललंय हे पाहण्यापेक्षा तुमच्याकडे जे काही सोळा दहा वीस आमदार निवडून आहेत ते तुमच्याबरोबर कसे राहतील याच्यावर तुम्ही जास्त मेहनत करायला हवी अशा शब्दात शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. बुधवारी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्रीपदाबाबत आपले नाव चर्चेत आहे या प्रश्नावर ते म्हणाले की, मला याबद्दल काहीही माहिती नाही माझं नाव चर्चेत आहे किंवा नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी यावेळी दिली आहे.

    मनसेचा गैरसमज, कोणीही फसवलेले नाही

    मनसेबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मनसेला महायुतीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं, काही जागा सोडण्याची ही तयारी झाली होती. दादर माहीमची जागा कोणी मागत असेल, तर ती जागा शिंदे साहेब सोडणारच नाहीत ना, त्यामुळे कोणीही कोणाला फसवलेले नाही, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल तो लवकरात लवकर दूर होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे. सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या टप्प्यात अंधारात उडी मारली होती मग असं असताना मुख्यमंत्री त्यांच्यावर अन्याय व्हावं असं कसं होऊ देतील असा सवालही उदय सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.
    Ratnagiri News : योगेश कदमांचा एकहाती विजय, रामदास कदमांच्या होमपिचवर मनसेच्या शिलेदाराचे डिपॉझिट जप्त

    ….आता माझा उदय हा किरणसह झाला आहे

    आमचा अस्त करणारे आता असताला गेले आहेत आणि आता माझा उदय हा किरणसह झाला आहे, असा टोला उदय सामंत यांनी नाव न घेता रत्नागिरी येथील ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार बाळ माने यांना लगावला आहे. इतकेच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही लोक शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत त्यांच्याजवळ मी येत्या आठ ते दहा दिवसात बोलणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बरेच मोठे नेते आमच्याबरोबर आलेले तुम्हाला पाहायला मिळतील, असेही सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे

    आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांना आम्ही सगळ्या आमदारांनी सगळे अधिकार दिले आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा हा सर्वोच्च स्थानावर असावे असं आम्हाला वाटणे हे स्वाभाविक आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन उभारत आहेत याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, आता त्यांना दुसरे कामच नाही आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने काल सांगितलं आहे अशा शब्दात उदय सामंत यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
    देवेंद्र फडणवीसांनी तर कमालच केली! स्वत:च्या दोन PA ना आमदार केले, हा ट्रेंड काय सांगतोय?

    Uday Samant : उबाठातील लोक शिवसेनेत येण्यास इच्छुक, येत्या ८ ते १० दिवसात… उदय सामंत यांचं मोठं विधान

    रिफायनरी ग्रामस्थांना नकोय, लादणार नाही –

    रत्नागिरीच्या विकासाकरता आपण कटिबद्ध आहोत. रत्नागिरी येथील विमानतळ लवकरच सुरू होईल, त्याचं काम सुरू आहे. पर्यटन उद्योग क्षेत्रातही काम केले जाईल. रिफायनरी उद्योग हा तेथील जनतेला नको असेल, तर तो तो तेथील जनतेवर लादला जाणार नाही जाणार नाही. दुसरा पर्यायी प्रकल्प आणला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मला जनतेने आशीर्वाद देऊन निवडून दिलं आहे, याबद्दल महायुतीचा आभार मेळावा आपण लवकरच घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed