• Sat. Sep 21st, 2024

येवल्यातील सभा ते गृहमंत्रिपदाचा राजीनामा, छगन भुजबळांचे शरद पवारांना थेट सवाल

येवल्यातील सभा ते गृहमंत्रिपदाचा राजीनामा,  छगन भुजबळांचे शरद पवारांना थेट सवाल

बीड : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलताना शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शरद पवार यांची सभा इथं झाली. पहिली सभा येवल्यात झाली. दुसरी सभा बीडला झाली. तिसरा नंबर हसन मुश्रीफ म्हणजेच कोल्हापूरला झाली. आंबेगावला सभा होणार सांगितलं पण झाली नाही. सगळीकडून गाडी बारामतीला आली की अजितदादा आमचे नेते आहेत, असं सुप्रियाताई सुळे म्हणणार, शरद पवार म्हणणार तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत म्हणा, आशीर्वाद देऊन वाद मिटवा, असं छगन भुजबळ म्हणाले.

तुम्ही काय सांगता काय बोलता आम्हा कळत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. तुमच्या सोबत असलेले लोक भाषण करतात त्यांनी भाजपसोबत जाऊया म्हणून सह्या केल्या होत्या. वरिष्ठ म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बोललो होतो. २०१४ पासून गेल्या पाच सहा महिन्यांपासून कुणाला सांगितलं,काय सांगितलं, अजित पवार, प्रफुल पटेल,जयंत पाटील यांना सांगितलं, दिल्ली जायचं चर्चा करायची, एवढी मंत्रिपद द्यायची, एवढे आमदार पाहिजेत, खासदार पाहिजेत मग आता काय झालं की आमच्या सगळ्यांच्या मतदारसंघात बैठक घेता, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
Pune Special Train: आनंदाची बातमी: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना पुण्यातून ३ विशेष रेल्वे, संपूर्ण वेळापत्रक
येवला मतदारसंघात शरद पवार यांनी माफी मागितली. कोल्हापूर ते गोंदिया मतदारसंघात किती ठिकाणी माफी मागणार आहात असा सवाल केल्याचं भुजबळ म्हणाले. आम्हाला हा रस्ता कुणी दाखवला तुम्हीच दाखवला, असं भुजबळ म्हणाले. २०१९ ला अजित पवार यांचा शपथविधी झाला त्यावेळी तुम्ही ती गुगली होती, असं म्हटला पण आपल्या प्लेअरला कोण बाद करतं का असा सवाल भुजबळ यांनी केला.

ईडीच्या कारवाईला घाबरले म्हणून गेलो नाही, घाबरलो नाही, तुमच्यासोबत राहिलो. १९९१ पासून तुमच्यासोबत राहिलो. काँग्रेसमधून बाहेर काढलं तेव्हा तुमच्यासोबत उभा राहिलो होतं, असं भुजबळ म्हणाले. काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मुख्यमंत्री झालो असतो, असं भुजबळ म्हणाले.
Raj Thackeray: कोकणी जनतेला सल्ला, पेव्हर ब्लॉकवरुन वाभाडे, रट्टे देण्याचा इशारा, राज ठाकरेंचे सरकारला खडेबोल
तुम्ही वैयक्तिक गोष्टींवर बोलायचं नाही,असं सांगितलं होतं. पण, अजित पवारांना धनंजय मुंडे यांचा इतिहास सांगायला सांगता, तुम्ही कुठून कुठे आलात , असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

२००३ ला २३ डिसेंबर रोजी गृहमंत्री पदाचा राजीनामा का घेतला होता. तेलगीचं प्रकरण होतं, त्याला अटक मी केली. मोक्का लावला होता. काही लोकांनी आरोप केले आणि राजीनामा द्यायला सांगितला. भुजबळांचा राजीनामा घेऊ नका असा फोन आला होता, पण राजीनामा घेतला गेला, असा सवाल भुजबळांनी केला.

Dhananjay Munde : बीड जिल्ह्याला शरद पवारांनी काय दिलं हा प्रश्नच, धनंजय मुंडे यांचा बीडच्या सभेतून थेट सवाल

५५ वर्ष राजकारणात अनेक धोक्यातून गेलोय; मारणाऱ्याला बक्षीस; छगन भुजबळांचं थेट उत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed