• Sat. Sep 21st, 2024
सना खान हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मारेकऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यातही होणार अटक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांचा आधार घेत खंडणीची मागणी केल्याप्रकरणातही मारेकरी अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासह पाच जणांना पोलिस प्रोटेक्शन वॉरंटवर अटक करणार आहेत. पुढील आठवड्यात या प्रकरणात अटकेची शक्यता आहे.

दरम्यान, खूनप्रकरणात पोलिस कोठडी संपल्याने मानकापूर पोलिसांनी पप्पू शाहू, राजेश सिंग, धमेंद्र यादव, त्याचे वडील रब्बू चाचा ऊर्फ रविशंकर यादव व कमलेश पटेल या पाच जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाचही जणांची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली.

सना खान हत्येच्या चौकशीसाठी भाजप नेत्यांना लपून छपून बोलवतात | विजय वडेट्टीवार

दरम्यान, गेल्या तीन आठवड्यापासून मध्य प्रदेशातील जबलपूर येथे तळ ठोकून असलेले पोलिसांचे पथकही नागपुरात परतले आहे. पोलिसांच्या पथकाने हिरण व नर्मदा नदीसह धरणात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांच्या मदतीने सना यांच्या मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, पोलिसांना मृतदेह आढळून आला नाही. पप्पू याने नदीत मृतदेह फेकला नसून तो अन्यत्र गाडला असावा, अशी दाट शक्यता आहे.

मात्र, याबाबत तो काहीही सांगत नसल्याने मृतदेह शोधण्यात पोलिसांना अपयश आले. सना हत्याकांड प्रकरणात मध्य प्रदेशचे काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांची गुरुवारी दोन तास चौकशी करण्यात आली. पोलिस पुन्हा शर्मा यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे.

देवदर्शनासाठी निघाले, वाटेतच काळाची झडप, अपघातात दोघा भावांचा अंत; कुटुंबाचे आधार हरपले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed