• Sat. Sep 21st, 2024

CBI च्या छाप्यानंतर कस्टम अधिक्षक मयंक सिंग यांनी जीवन संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

CBI च्या छाप्यानंतर कस्टम अधिक्षक मयंक सिंग यांनी जीवन संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांच्या घरी सीबीआयने परवा छापेमारी केली होती. सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या केल्याचे समोर आले. छापेमारी झाल्यावरच दुसऱ्याच दिवशी कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांनी आपलं जीवन संपवलं मयंक यांनी तळोजामधील एका तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मयंक सिंग यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. कस्टमकडे प्रलंबित असणारी २ बिले मयंक यांनी लाच घेऊन क्लिअर केल्याचा आरोप होता. मयंक सिंग यांच्या आत्महत्येनंतर खारघर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी खारघर येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. हा तरुण कोण? याचा तपास खारघर पोलीस करत होते. अखेर मृत व्यक्तीची ओळख पटली. या मृत व्यक्तीचे नाव मयंक सिंग असे असून ते तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटीत राहत होते.

मित्रासोबत फोटो पडला महागात, दुसऱ्या दिवशी मोबाईल पाहताच हादरली; डोंबिवलीत तरुणीचं टोकाचं पाऊल

पोलीसांच्या तपासात मयंक यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सूरु असल्याचे उघडकीस आले. याविषयी तपास सूरू असल्याने लगेच यावर बोलणे योग्य होणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी सांगीतले. मयंक यांची गाडी त्यांनी तलावापासून काही अंतरावर उभी केली होती.

खारघर येथील तळोजा तुरूंगाजवळील तलावात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. तीन घटनांमध्ये मागील तीन महिन्यात पहिले एकाचा त्यानंतर दोघांचे जीव गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यात या तलावाशेजारी गाडी धुणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच अनेक पर्यटक किंवा सहलीसाठी आलेले या तलावात पाण्याचा अंदाज न घेता अनेक युवक पोहतात. या तलावाला संरक्षण कुंपण घालावे, अशी मागणी अनेकांनी केली आहे.
Success Story : डाळिंबाच्या शेतीतून बक्कळ कमवलं, कमी खर्चात फुलवली बाग; यशोगाथा वाचून थक्क व्हाल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed