अजित पवार म्हणाले, आज कार्यकर्त्यांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं. अनेकांनी हातात हात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला वाटलं हात तुटतोय की काय… हातात हात घेत होते, हाताला किस करत होते, मुके घेतले. ‘मी म्हटलं आयला बायकोने कधी एवढे किस घेतले नाहीत’. काय चाललंय तरी काय आज. पण आज मी ठरवलं होतं चिडायचं नाही. गप बसायचं. सगळ्यांना हात जोडायचे. आज अनेक प्रकारच्या टोप्या मला घातल्या. एक टोपी काढले की, दुसरी टोपी, तिसरी टोपी. असं हे बारामतीकरांचे प्रेम. हे प्रेम बघून आता किती वाजता कामाला सुरुवात करायची आणि कधी झोपायचं, असा प्रश्न आहे. बारामतीकरांचं असं हे प्रेम बघून कामासाठी आणखी उत्साह वाढला आहे. अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.
अजित पवार म्हणाले, मला पहाटे उठून काम करण्याची सवय आहे. त्यामुळे अनेकदा माझी पत्नी वयाचा विचार करून दमानं काम करण्याचा सल्ला देते. ‘पाच वाजताच उठून कामाला लागतोय, बायको म्हणते दमान, दमान चाललंय काय? जरा वयाचा विचार करा’ असं विधान अजित पवार यांनी करताच बारामतीकर लोटपोट झाले. आज देखील सभा झाल्यानंतर पहाटे पावणेसहा वाजता मी कुठल्यातरी साईटवर असेल अनेकदा बारामतीकरांची गैरसोय टाळावी यासाठी मी पहाटे साईडवर आणि विकास कामांना भेट देत असतो. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीकर साखर झोपेत असतानाच कामाची पाहणी करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो.
मुख्यमंत्री व्हा…. २००४ ला राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळाला असतं. पण मी काय करणार, त्या संदर्भात मला काही गोष्टी बोलता येत नाहीत. तोही प्रसंग गेला त्यावेळी सोनिया गांधी विलासराव देशमुख यांना म्हणाल्या राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आलेत. मुख्यमंत्री त्यांचे आमदार ठरवतील. पण मुख्यमंत्री होऊ नाही शकला. त्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांचे ५४ आमदार होते आपले ५४ होते. अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्रीपद या अडीच वर्ष आम्हाला द्या. तशी काही चर्चा झाली नाही, त्या चर्चेत मी नव्हतोच. म्हणून मी त्या काही खोलात जात नाही. उपमुख्यमंत्री पदाला न्याय देण्याकरिता रात्रीचा-दिवस करून काम करायचे.