• Sun. Mar 15th, 2026

    भयंकर! नवऱ्याला घटस्फोट देऊन तरुणी प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली, पण नंतर घात झाला

    भयंकर! नवऱ्याला घटस्फोट देऊन तरुणी प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली, पण नंतर  घात झाला

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय परिचारिकेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना अजनी पोलिस स्टेशन हद्दीत घडली. परिचारिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हेगाराविरुद्ध शिवीगाळ, मारहाणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

    राजकिशोर राम ऊर्फ मोंटू बिहारी (वय २८, रा. रामटेकेनगर), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

    बंडाचं कारण, विकासाचं व्हिजन अन् विनोदांचा पाऊस; बारामतीकरांसमोर अजित पवारांची तुफान फटकेबाजी

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिचारिका असलेल्या तरुणीचे मोंटूसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान तरुणीचे लग्न झाले. दोन वर्षांपूर्वी तरुणीचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तरुणी मुलासह लिव्ह इनमध्ये मोंटूसोबत राहायला लागली. मोंटू हा गुन्हेगार असल्याचे तिला कळाले. मोंटू हा चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करायला लागला.

    पाच दिवसांपूर्वी तरुणी मुलासह आईकडे राहायला आली. २४ ऑगस्टला रात्री ९ वाजताच्या सुमारास मोंटू हा तिच्या घरी गेला. तिला तसेच तिच्या बहिणीलाही शिवीगाळ केली. तरुणीला मारहाण करून त्याने तिचा गळा आवळला. नागरिक जमल्याने मोंटू तेथून पसार झाला.

    दरम्यान, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोंटूचा शोध सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed