• Sat. Sep 21st, 2024
इंडिया आघाडीचा लोगो ठरला, ‘भारताची शान’ डिझाईनमध्ये? मुंबईतील बैठकीत मराठमोळे खाद्यपदार्थ

मुंबई : सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरातील बहुतांश विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. या ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोचे ३१ ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनावरण होणार आहे. इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन तयार करण्यात आले होते. त्यापैकी एका डिझाईनवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. या इंडिया आघाडीचा लोगो नेमका कसा असणार? याची उत्सुकता समर्थकांना लागली आहे.

नऊपैकी एका डिझाईनला काही महत्त्वाच्या पक्षांनी संमती दिली आहे. फायनल झालेल्या लोगोची डिझाईन इंडिया आघाडीतील काही इतर महत्त्वाच्या पक्षांना सुद्धा दाखवून त्यांची संमती घेतली जात आहे. या इंडिया आघाडी लोगोचे अनावरण ३१ ऑगस्टला रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये होईल. या आघाडीला इंडिया नाव असल्याने या लोगोमध्ये भारतीय राष्ट्रध्वज अर्थात तिरंग्याची झलक दिसणार आहे.

राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, पण… : सुप्रिया सुळे
या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष्यांच्या ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या बैठकीत त्या त्या पक्षाचा प्रत्येकी एक प्रमुख नेता हा समितीचा सदस्य असेल. इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील.

मी भाजपशी पॅचअप करु शकलो असतो, पण… उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
या बैठकीत पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडीकडून जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे. एकूण सहा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. हे सहा मुद्दे या चर्चेतील राष्ट्रीय अजेंडा ठरतील.

हम है ना ! भाजपला घाबरु नका, एक पक्ष म्हणजे देश नव्हे | उद्धव ठाकरे

इंडिया आघाडीचा जाहीरनामा नसेल तर राष्ट्रीय पातळीवरील सहा मुद्यांवर इंडिया आघाडी आहे, त्यावर चर्चा होईल. ३१ तारखेला मराठमोळ्या जेवणाची रेलचेल असणार. पुरणपोळी, वडापाव, झुणका भाकर आदी महाराष्ट्रातील व्यंजन असतील. ढोलताशा, लेझीम या पारंपरिक पद्धतीने नेत्यांचं स्वागत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed