• Sat. Sep 21st, 2024

फाळणीचा इतिहास शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मनात कटुता, हिंसा रुजण्याची भीती: शरद पवार

फाळणीचा इतिहास शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मनात कटुता, हिंसा रुजण्याची भीती: शरद पवार

म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशाच्या फाळणीचा इतिहास शिकविण्याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) त्यांच्या संलग्नित शाळांना पाठविलेल्या परिपत्रकामुळे समाजात कटुता आणि तेढ निर्माण होईल. त्यामुळे सीबीएसई बोर्डाला आपले मत कळवावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या शिक्षण विभागाला केली. फाळणीचा इतिहास हा रक्तपात, हिंसा, कटुतेचा आहे. समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

सरहद पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीसह गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संजय नहार, संत सिंग मोखा, शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार आदी उपस्थित होते.

सीबीएसई बोर्डाने पाठविलेले परिपत्रक मला चिंताजनक वाटते. देशाची फाळणी झाल्यानंतर समाजाच्या स्थितीची माहिती विद्यार्थ्यांना देण्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या मते, हा फाळणीचा इतिहास वाचला तर त्यातून वेदनेऐवजी हिंसा, रक्तपात, कटुता रुजण्याची शक्यता आहे. तो इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे हे देशाच्या आणि समाजाच्या ऐक्यासह सांघिक भावनेच्या दृष्टीने योग्य नाही. त्याचा सीबीएसई बोर्डाने विचार करावा. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने आपले मत कळवावे. समाजात विसंवाद वाढणार नाही याची काळजी घ्यावी,’ अशी सूचना शरद पवार यांनी केली.

Sharad Pawar: ईडीच्या भीतीनं सहकाऱ्यांनी वाट बदलली, भेकड प्रवृत्तीला लोक जागा दाखवतील, शरद पवारांचा हल्लाबोल

शरद पवार ‘त्यांना’ पवार ‘बरोबर’ करतात; सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याची चर्चा

‘शिक्षणाची गरज आहे अशा देशातल्या कमकुवत प्रांतातल्या मुलांना पुण्यात आणून शिक्षणाच्या माध्यमातून उभारी देण्याचा मार्ग कोणाला सुचला नव्हता. सरहद संस्थेने हे काम केल्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांचे अश्रू पुसण्याचे महत्त्वाचे काम होत आहे,’ असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. शरद पवार हे मला ८३ वर्षांचे असल्यासारखे वाटत नाहीत. ते ताठ मानेने अनेकांना उभे करतात. स्वतःही उभे राहतात. कोण काही ‘गडबड’ करीत असेल, तर त्यांनाही ते ‘बरोबर’ करतात,’ असे शिंदे यांनी सद्यस्थितीच्या राजकारणावर अप्रत्यक्षरित्या भाष्य केले असता उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Ishwarlal Jain: ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला, पण १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोनं हाती लागलं

महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरू मानत होते; तसेच गोखले हे बॅरिस्टर जीना यांना मार्गदर्शन करीत होते. सार्वजनिक जीवनात येण्याची नव्या पिढीने भूमिका घेतली आहे. या पिढीला वैचारिक जाण असावी, देशाच्या इतिहासाची माहिती असावी; तसेच समाजाचे प्रश्न माहिती असावेत. समाजातील विविध घटकांना एकत्रितपणे ठेवण्याची शक्ती निर्माण झाली पाहिजे. गोखले यांना अभिप्रेत अससेले काम सरहद संस्था करीत आहे.

– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आपले सहकारी विकासासाठी नव्हे तर ईडीमुळे भाजपच्या दावणीला बसले, शरद पवार स्पष्टच बोलले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed