• Sat. Sep 21st, 2024

पाय ट्रेनच्या चाकाखाली आला, पंजा रक्तबंबाळ, तरीही ‘आई ठीक आहे ना’ विचारत राहिली

पाय ट्रेनच्या चाकाखाली आला, पंजा रक्तबंबाळ, तरीही ‘आई ठीक आहे ना’ विचारत राहिली

सोलापूर: बंगळुरूमधील मायलेकी उपचारासाठी पुण्यात आल्या होत्या. मदतीला जवळचे कोणीच नसताना आलेल्या प्रसंगांना तोंड देत दोघी मायलेकी गावी निघाल्या होत्या. सोलापूर रेल्वे स्थानकावर देखील त्यांचे काम होते. शनिवारी दुपारी कुर्डवाडी रेल्वे स्थानक आल्यावर असे वाटले की सोलापूरच आले. त्यामुळे त्या दोघी रेल्वेतून खाली उतरल्या होत्या. पण, हे सोलापूर रेल्वे स्थानक नाही हे लक्षात आल्यावर त्या दोघी माय लेकी घाईगडबडीत पुन्हा रेल्वेत चढत होत्या. आजारी आईला बोगीत बसवण्यासाठी चढताना लेकीचा तोल गेला आणि ती धावत्या रेल्वेखाली आली. जागृत प्रवाशांनी तात्काळ साखळी ओढून गाडी थांबवली. प्रवाशांनी ताबडतोब पोलिसांना कळविले आणि लोहमार्ग पोलिस धावत आले.

तुटून लुळा पडलेल्या पायाचा पंजा घेऊन लोहमार्ग पोलिसांनी आणि आरपीएफ पोलिसांनी तिला सोलापूरच्या रुग्णालात हलविले. तरीही तिचं लक्ष आजारी आईकडे होतं. गंभीर जखमी असताना मुलगी आई बाबत विचारत होती. फैमिदा महमद बानो (वय ४०, रा. बंगळुरू) असे जखमी लेकीचे नाव आहे. कुर्डवाडी (जिल्हा सोलापूर) लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी जखमी मुलीला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हृदयपिळटवून टाकणाऱ्या घटनेने लोहमार्ग पोलिसांचे डोळे पाणावले होते.

कॉफी शॉपच्या आतमध्ये ६ बेडरूम, पोलिसांनी धाड टाकताच कॉलेजचे विद्यार्थी नको त्या स्थितीत दिसले
कुर्डवाडी रेल्वे स्थानकावर चुकून उतरल्या

फैमिदाची आई ही वेगवेगळ्या आजाराने अनेक दिवसांपासून त्रस्त आहे. फैमिदाने उपचारासाठी त्यांना पुण्यात एका खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी आणले होते. उपचारानंतर दोघी गावी परतण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, तिकीट कुठं काढायचं? कोणती रेल्वे भेटेल? याची काहीच माहिती या दोघा मायलेकींना माहिती नव्हती. इतर प्रवाशांची मदत घेत तिकीट काढल्या आणि उद्यान एक्स्प्रेसने पुण्यातून शनिवारी दुपारी कुर्डुवाडीत आल्या. स्थानकार रेल्वे थांबताच गोंधळल्या आणि दोघी खाली उतरल्या. सोलापूर रेल्वे स्थानक आणखी पुढे असल्याचे लक्षात आले आणि इतक्यात इंजिनने भोंगा वाजवला. घाईगडबडीत बोगीत चढण्याचा प्रयत्न करू लागल्या.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

फैमिदा चढताना तोल जाऊन पडली, रेल्वे खाली सापडली

धावत्या रेल्वेत आईला बोगीत चढवण्याच्या प्रयत्नात फैमिदाचा तोल गेला. फैमिदा रेल्वे डब्याच्या चाकाखाली सापडली. इतक्यात रेल्वेचे चाक तिच्या उजव्या पायाच्या पंज्यावरून गेले आणि ती जोरात ओरडली. प्रवाशांच्याही लक्षात आले आणि त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबवली. बंदोबस्तावरील महिला पोलिस खाली उतरून तिला बाहेर काढले आणि तत्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविले. स्टेशनवर सुरक्षेसाठी थांबलेले पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ सावंत, महिला पोलिस कॉन्स्टेबल मधुरा कुलकर्णी, सना बानकरी, हवालदार रेश्मा कदम, आरपीएफ जवान खारे, ए.एस.आय. बोराटे, नागणे यांचे पथक फेमिदाच्या मदतीला धाऊन आले आणि तिला दिलासा मिळाला.

रुग्णालयातच कोसळली, रात्रभर डॉक्टरांची वाट पाहिली, उपचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed