• Mon. Nov 25th, 2024

    समुद्राला उधाण, जाळी बोटीच्या पंख्याला अडकली, मच्छीमार बोटीबाहेर फेकले गेले, अन् मग

    समुद्राला उधाण, जाळी बोटीच्या पंख्याला अडकली, मच्छीमार बोटीबाहेर फेकले गेले, अन् मग

    सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील आचरा पिरावाडी येथील मासेमारीसाठी गेलेले तीन मच्छीमार अचानक बोटीतून बाहेर समुद्रात फेकले गेले. शनिवारी पहाटे मासेमारीसाठी म्हणून पूजा बोट घेऊन गेलेले आचरा पिरावाडी येथील तीन मच्छिमारांची जाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे होडीच्या पंख्याला अडकून झालेल्या दुर्घटनेत तीन मच्छिमार बोटीबाहेर फेकले गेले. समुद्राच्या खडकाच्या आधाराला राहिलेल्या मच्छिमारांना पिरावाडी येथील मच्छिमारांनी धाव घेत सुखरूप बाहेर काढले.

    आचरा समुद्रात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आचरा पिरावाडी येथील मच्छिमार विदेश नारायण कुमठेकर, आदित्य बापू धुरी, वैभव कुमठेकर हे आपली पूजा बोट घेऊन मच्छिमारी साठी गेले होते. मुणगे देवगड बाजूने मासेमारी करत असताना अकस्मात समुद्राला आलेल्या उधाणामुळे मासेमारीसाठी समुद्रात टाकलेली जाळी होडीच्या इंजिनच्या पंख्याला अडकून इंजिन बंद पडल्याने होडी मुणगे आडबंदर मोबार धाकटे केवूंडले येथील खडकाळ भागात दगडांवर आपटल्याने झालेल्या दुर्घटनेत होडीतील तिघेही बाहेर फेकले गेले. खडकांच्या आधारामुळे सुदैवाने होडीतील तिघेही बचावले.

    गोविंदांसाठी मोठी बातमी, सरकार ५० हजार गोविंदांना विमाकवच देणार
    सदर दुर्घटनेची माहिती समुद्रात मच्छिमारी करणारे लियाकत मुजावर यांनी आचरा येथील मुझफ्फर मुजावर, सकलेन मुजावर आदींना फोन करुन सांगितल्यावर आचरा पिरावाडी येथील सकलेनमुजावर, आदिल मुजावर, राजू मुजावर, साहिल मुजावर, स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली.

    काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

    आडबंदर येथे जात खडकात अडकलेल्या मच्छिमारांना सुखरूप आचरा येथे घेऊन आले. घटनेची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलीस नाईक परब,जगताप, मनोज पुजारे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जेरान फर्नांडिस,अनिल करंजे, पाडूरंग वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    रुग्णालयातच कोसळली, रात्रभर डॉक्टरांची वाट पाहिली, उपचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *