• Sun. Sep 22nd, 2024
Kolhapur: शाहू महाराजांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा आणि संभ्रम कायम; म्हणाले, मला यापूर्वी…

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर येत्या शनिवारी २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या सभेचे अध्यक्षपद कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे भुषवणार आहेत. यामुळे अनेक राजकीय चर्चा ना उधाण आले आहेत. मात्र शाहू महाराज छत्रपती यांनी मला यापूर्वी लोकसभा लढवण्याची इच्छा होती, असं म्हणत उमेदवारी संदर्भात राजकीय चर्चा आणि संभ्रम कायम ठेवला आहे.

सभेच निमंत्रण मिळाले असल्याने मी सभेला जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोल्हापुरात पक्षाच्या स्थापनेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेवर वर्चस्व होत. मात्र राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर आगामी काळात होऊ घातलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागेवर महविकास आघाडी कडून उमेदवार कोण असणार याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

शिवाय पक्ष मजबूत करण्यासाठी खासदार शरद पवार राज्यात दौरे करत आहेत यासाठी येत्या २५ ऑगस्ट रोजी शरद पवार यांची कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक मैदानात जाहीर सभा होणार आहे, या सभेचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज भूषवणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज श्रीमंत शाहू महाराजांना याबाबत विचारले असता यापूर्वी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा होती असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिवाय सभेच निमंत्रण मिळाले असल्याने मी सभेला जाणार आहे असे ही शाहू महाराज म्हणाले आहेत. शाहू महाराजांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम कायम आहे.

सर्वसमावेशक चेहरा म्हणून होऊ शकतो विचार

शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये झालेल्या पक्ष फुटी नंतर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जागांबाबत महविकास आघाडीत जागा कोणाला द्यायची आणि उमेदवारी कोण असेल याची चर्चाच सुरू आहे. २००९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील दोन्ही जागा गमावले आहेत मात्र आमदारांची संख्या लक्षात घेता काँग्रेसने कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगितला आहे.

महाविकास आघाडी कडून जिल्ह्यातील दोन्हीपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेस श्रेष्ठीकडून मागणी करत आहेत, मात्र जर राष्ट्रवादीकडून शरद पवारांनीच थेट कोल्हापूरच्या जागेबाबत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यास सर्व समावेशक चेहरा म्हणून श्रीमंत शाहू महाराजांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवाय कोल्हापूरच्या राजघराण्याला राज्यात मोठा मानसन्मान आहे. यापूर्वी छत्रपती मालोजीराजे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत विधानसभा गाठली होती. तर आताच्या स्वराज पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांना याआधी राष्ट्रपती कोट्यातून भारतीय जनता पक्षाने खासदारकी बहाल केली होती, यामुळे कोल्हापूरचे राजघराणे ज्या पक्षाच्या बाजूने कौल देईल त्या पक्षाला जनाधार मिळणार असल्याने राजघराण्याला सोबत घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात चढाओढ सुरू आहे.

काका पुतण्याच्या खेळीने ठाकरे सावध, एकजुटीने काँग्रेस सोबतीला, २०२४ ची स्ट्रॅटजी काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed