• Sat. Sep 21st, 2024
भीषण! वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटातून थेट दरीत कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील करुळ घाटात डंपर दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त डंपरचा चालक सुहास चौगुले (रा. उजगाव कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौगुले हे वाळूच्या ढिगार्‍याखाली दबले गेल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच सह्याद्री जीवरक्षक टीमनेही घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे वाळूने भरलेला डंपर करून घाट मार्गे कोल्हापूरकडे जात होता. मात्र करुळ घाटात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. यावेळी चालक सुहास चौगुले वाळूच्या ढिगाळ्याखाली अडकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह दोन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रामदास भाईंना हटवा, शिंदे गटात नाराजीनाट्य, ३०० पदाधिकारी ‘वर्षा’वर, राजीनाम्याचा इशारा

करूळ घाटाच्या मार्गे दर दिवशी मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक कोल्हापूरच्या दिशेने होत असते. प्रचंड प्रमाणात अवजड वाहतूक या मार्गावरून होत असते. करूळ घाटाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक ठिकाणचे सुरक्षा कठडे देखील तुटलेले आहेत. महामार्गावर खड्डे देखील मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. अशा परिस्थितीचं वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. घाटामध्ये अपघात होऊन अनेक जणांना आतापर्यंत जीव गमवायला लागला आहे.

दरम्यान, वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक व पोलीस कॉन्स्टेबल श्री. पवार, श्री. पडवळ व नारणवर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed