• Mon. Nov 25th, 2024

    Pune News : पुणे रेल्वे विभागाचा एक निर्णय आणि २ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरळीत

    Pune News : पुणे रेल्वे विभागाचा एक निर्णय आणि २ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरळीत

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेसचे बिघडलेले वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने दोन्ही गाड्यांसाठी एक अतिरिक्त रेक (स्क्रॅच रेक) देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून गाड्या सुरळीत धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

    पुणे रेल्वे विभागातील हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसचे वेळापत्रक बिघडले आहे. ही गाडी कधी-कधी रद्द होते. बहुतांश वेळेला गाडीला उशीरही होत होता. त्यामुळे या गाडीसाठी ३० जुलै रोजी ‘झेलम एक्स्प्रेस’चा रेक वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे झेलम एक्स्प्रेसचे वेळापत्रक बिघडले. दोन्ही गाड्यांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत रेल्वेकडे प्रवाशांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पुणे रेल्वे विभागाने या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक सुरळित चालावे; म्हणून एक अतिरिक्त रेक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ ऑगस्टपासून या दोन गाड्यांसाठी नवीन अतिरिक्त रेक देण्यास सुरुवात केली.

    अमरसिंह पंडितांनी वय काढलं, पवार म्हणाले, ज्याच्याकडून सगळं घेतलं, त्याबद्दल थोडीतरी माणुसकी ठेवा…!

    आवश्यक असेल, त्या मार्गावर हा अतिरिक्त रेक देण्यात येणार आहे. अतिरिक्त रेक दिल्यानंतर १३ ऑगस्टपासून झेलम एक्स्प्रेस वेळेवर सुटत आहे. हावडा दोन दिवस वेळेवर सुटली. मात्र, जळगाव येथील ब्लॉकमुळे तिला दोन दिवस थोडासा उशीर झाला; पण येत्या दोन दिवसांत ही गाडीदेखील वेळेत धावेल. एक रेक वाढल्यामुळे दोन्ही गाड्या वेळेवर सुटण्यास मदत होणार आहे.

    नेतेमंडळी ताफा सोडून मेट्रोने प्रवास करणार का?, पत्रकारांच्या प्रश्नाला अजितदादांचं सकारात्मक उत्तर

    पुणे रेल्वे विभागाने हावडा-पुणे व झेलम एक्स्प्रेससाठी नवीन रेक मिळवण्याचा प्रयत्न केला. नवीन रेक मिळाल्यानंतर आता दोन्ही गाड्या वेळेत धावत आहेत. या दोन्ही गाड्या पुणे विभागासाठी महत्त्वाच्या असून, भविष्यात या गाड्या वेळेवर धावण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.

    – डॉ. रामदास भिसे,

    जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed