जी फिर्याद दाखल झाली आहे, त्यात दम नाही. सर्व व्यवस्थित होईल, थोडा वेळ लागेल, राजकीय दबावातून ही कारवाई झाली, असे मला वाटत नाही. सीबीआयकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे. काही काळासाठी हा त्रास असेल मात्र. सर्व निवारण होणार आहे, त्याची चिंता नाही, असे ईश्वर बाबूजी जैन यांनी म्हटले आहे.
ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे १५ वर्ष खजिनदार होते. जळगावसह नाशिकमधील एकूण ६ कंपन्यांवर छापेमारी करण्यात आली आहे.
राजकीय कारणातूनही चौकशीची चर्चा
माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अद्यापही शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर ईश्वरलाल जैन यांचे चिरंजीव माजी विधानपरिषद आमदार मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिले आहे. ईश्वरलाल जैन हे दहा ते पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण राज्याचे खजिनदार होते. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची जागा ही सुद्धा ईश्वरलाल जैन यांच्याच नावावर आहे. राज्याचे खजिनदार असल्या कारणाने त्यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे व माहिती घेण्यासाठीची ही कारवाई असल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. नेमकी राष्ट्रवादी कुणाची हा वाद जेव्हा निर्माण होईल तेव्हा खजिनदार यांच्याकडे असलेली आवश्यक ते माहिती तसेच कागदपत्रे महत्त्वाची ठरू शकतात. त्यासाठीच ही कारवाई करण्यात आल्याची ही राजकीय गोटात चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.