जळगाव : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून एनडीए बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, दुसरीकडे देशातील २६ राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे. जळगावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तयारी लागण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी जळगावातील शिवसैनिकांना जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात पक्षाचं संघटन मजबूत करण्यास सांगितलं आहे. लोकसभेच्या दोन्ही जागांसह ११ विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी सुरु करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मुंबईत झालेल्या जळगावातील शिवसैनिकांच्या बैठकीत ठाकरे यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाचे जळगावचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी उद्धव ठाकरेंसोबत प्रदीर्घ बैठक झाल्याची माहिती दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली असून दोन्ही लोकसभा आणि ११ जागांची तयारी करत असल्याचं ते म्हणाले.

महाविकास आघाडी म्हणून आमच्या जागांवर निवडणूक लढवणार आहोत. जर काही कारणांमुळं महाविकास आघाडी होऊ शकली नाही तर स्वतंत्रपणे लढायची तयारी असल्याचे भंगाळे म्हणाले.
जळगावातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे तर जळगावमध्ये उन्मेश पाटील खासदार आहेत. जळगावातून शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील आणि लता सोनावणे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. हे सर्वजण ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात गेले होते.
गेल्या निवडणुकीत जळगावची जागा राष्ट्रवादीनं लढवली होती. तर, रावेरची जागा काँग्रेसनं लढवली होती. त्यामुळं आगामी काळात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या जागा कुणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे.