• Mon. Nov 25th, 2024

    नागपुरातील दोन पोलीस मित्रांवर टोळक्याचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

    नागपुरातील दोन पोलीस मित्रांवर टोळक्याचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

    नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत राजीव नगर चौकात पानठेलावर बसलेल्या दोन पोलिस मित्र असलेल्या तरुणांवर सहा ते सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राकेश मिश्रा (वय २७, रा. राजीवनगर) असे मृताचे नाव असून रवी जैस्वाल (वय २८) हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

    हल्ल्यानंतर सर्व आरोपी कारमधून पळून गेले. ही घटना बुधवारी रात्री घडली. पोलीस मित्र असलेले दोघेही तरूण या भागातील आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करायचे. त्याचवेळी राकेश हा पोलिस मित्रही होता, म्हणजेच तो पोलिसांसाठी खबरदार म्हणून काम करत होता.

    बॅटने काच फोडली, अंधेरीचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवकरांच्या गाडीवर हल्ला

    राकेश आणि त्याचा साथीदार रोज संध्याकाळी बसस्टॉपवर यायचे आणि बाजूला एका पायरीवर बसायचे. रोजच्या प्रमाणे बुधवारी रात्रीही दोघे तिथेच बसले होते. त्याचवेळी कारमधून आलेले सहा ते सात तरुण तेथे पोहोचले. यावेळी सर्व आरोपींनी आपले चेहरे कापडाने बांधले होते.

    गाडीतून उतरलेले तरुण राकेश आणि रवी यांच्या जवळ आले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करू लागले. अचानक झालेल्या हल्ल्यात राकेश जखमी होऊन तिथेच खाली पडला. तर रवीने आपला जीव वाचवण्यासाठी शेजारी असलेल्या एका महिला डॉक्टरच्या दवाखान्यात धाव घेतली आणि काचेच्या केबिनला आतून कुलूप लावले.

    त्याचा पाठलाग करत आरोपी तेथे पोहोचले आणि केबिनची काच फोडून आत घुसून रुग्ण व डॉक्टरांसमोर त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी गाडीत बसून तेथून पळ काढला. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक भीमा नरके आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. हा हल्ला कशामुळे झाला हे समजू शकलेले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

    Latur News: इंजिनमधून धुराचे लोट, चालकाच्या काळजाचं पाणी पाणी, प्रवाशांची धावपळ, त्या एसटीत काय घडलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *