• Mon. Nov 25th, 2024
    वंचित फॅक्टरने काँग्रेसचा गेम केला, पण २०२४ च्या राजकारणासाठी आंबेडकरांना त्यांचीच गरज!

    मुंबई : २०१९ ला वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत झाली. आणि भाजपच्या विजयी रथाला जोर मिळाला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेल्या वंचितलाही काँग्रेस विरोधात जाऊन यशस्वी राजकारण करता आलेलं नाही. खुद्द प्रकाश आंबेडकारांनाही काँग्रेसच्या मदतीविना अनेकदा पराभव पत्कारावा लागलाय. वंचित फॅक्टरने राज्यभर काँग्रेसला धक्का दिला असला तरी काँग्रेसमुळे बालेकिल्लातच प्रकाश आंबेडकरांची पिछेहाट झालीय. अकोला जिल्ह्यात प्रकाश आंबेडकराची निर्णायक ताकद आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत गुलाल उधळण्यासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागतेय. आता २०२४ ला पुन्हा एकदा अकोल्यातून लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. पण प्रकाश आंबेडकरांसाठी ही लढाई सोपी आहे का?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    आठवण……

    २००१ ला काँग्रेससोबत मतभेद झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र वाटचाल सुरू केली. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसविरोधी राजकारण सुरू करताच काँग्रेसने आंबेडकरांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला. पण प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या वादाचा भाजपलाच फायदा झाला.

    Pawar vs Modi : मोदी यांनी फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते; शरद पवारांची खोचक टीका
    अकोला लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

    > २००४ ला भाजप, काँग्रेस आणि वंचितमध्ये अर्थात प्रकाश आंबेडकरांसोबत तिरंगी लढत.
    > काँग्रेस उमेदवार लक्ष्मणराव तायडे आणि प्रकाश आंबेडकरांमधील मत विभाजनामुळे भाजपचे संजय धोत्रे विजयी.
    > २००९ ला काँग्रेस उमेदवार बाबासाहेब धाबेकरांमुळे आंबेडकरांचं मताधिक्य घटलं, भाजप उमेदवार संजय धोत्रे दुसऱ्यांदा विजयी.
    > २०१४ ला काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांनी अडीच लाख मतं घेतली.
    > त्यामुळे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या नंबरला फेकले गेले आणि संजय धोत्रे आरामात विजयी.
    > २०१९ ला आंबेडकरांनी भाजपला लढत दिली, पण काँग्रेसच्या हिदायत पटेलांनी अडीच लाख मत घेतल्याने संजय धोत्रेंचा विजय.

    राज्यात गतिमान प्रशासनाचा माणगाव पॅटर्न; महसूल विभागात फक्त १० दिवसांत मुलीला मिळाली अनुकंपा तत्त्वावर नोकरी
    अकोल्यात काँग्रेस आणि वंचितकडे हक्काचा मतदार आहे. काँग्रेस आणि वंचितने एकजूट दाखवली. तर भाजप उमेदवाराच बंदोबस्त होऊ शकतो. मात्र, काँग्रेस आणि वंचितमधील मतविभाजनामुळे भाजपची विजय सोप्पा होत आलेला आहे. २०२४ साठी वंचित आणि काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर भाजपची वाट बिकट होऊ शकते.

    २०१९ च्या निवडणुकीचा निकाल

    > भाजपच्या संजय धोत्रे यांना पाच लाख ५४ हजार मतं मिळाली.
    > वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७८ हजार मतं मिळाली.
    > तर काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या पारड्यात दोन लाख ५४ हजार मतं आली.

    चिंताजनक! स्वातंत्र्याला झाली ७६ वर्षे, तरी नाशिकमधील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंचित
    ही आकडेवारी पाहिली तर वंचित आणि काँग्रेसची ताकद एकत्र आली तर भाजपला तरडं आव्हान मिळू शकतं. काँग्रेस आणि वंचितमधील आपापसातील लढाईमुळेच भाजपला एकहाती वर्चस्व राखता आलेलं आहे. २०२४ साठीही प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली तर भाजप अगोदर काँग्रेसच्याच आव्हानाला त्यांना सामना करावा लागेल. प्रकाश आंबेडकरांसाठी ही लढाई सोपी आहे का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *