बीड शहरातील शरद पवार यांच्या सभेआधीच बॅनर झळकले. या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो लावत यातून कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, अशी भावनिक साध शरद पवारांना घालण्यात आली. उद्या शरद पवार बीडमध्ये सभा घेत असल्याने सभेपूर्वीच हे बॅनर पहायला मिळत आहेत. दरम्यान त्यानंतर आज या कार्यकर्त्यांनी पुढे येत अजित पवार हे शासन प्रशासनावर चांगली पकड ठेवणारे एक नेतृत्व आहे. याच नेतृत्वाला जर शरद पवारांनी साथ दिली तर महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व असलेलं तसेच शासन प्रशासनावर पकड असलेलं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राला मिळेल. यासाठी आम्ही शरद पवारांना भावनिक साद घातल्याचे यावेळेस बीडमधील अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
याचबरोबर उद्या बीडमध्ये शरद पवारांची सभा होत असल्याने अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी आम्ही भव्य सत्कारदेखील आदरणीय शरद पवार यांचा करणार आहोत, असेही माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मात्र या बॅनरमुळे जी चर्चा जिल्हाभरात सुरू झाली होती, नेमकं हे बॅनर कोणी लावले? यावर आता पडदा पडला आहे. कार्यकर्त्यांनी आम्ही बॅनर का लावले याचे स्पष्टीकरण देत माध्यमांशी संवाद साधल्याने नेमकं कारण काय होतं? यामध्ये अजित पवारांसाठी शरद पवारांना आम्ही भावनिक साध घातली असल्याचे यावेळेस कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे.
मात्र महाराष्ट्रात दुसरा भूकंप जर पाहायला मिळाला तो राष्ट्रवादीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. यानंतरच शरद पवार यांनी महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यात आता सध्या शरद पवार यांचा दौरा हा मराठवाड्यात आहे. उद्या बीडमध्ये शरद पवारांची सभा होत असल्याने अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी या सभेआधीच शरद पवारांना भावनिक साथ घालत आपल्या माणसाला साथ द्या म्हणत बॅनरबाजी केली. आता या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्या भव्य सत्कार देखील आम्ही शरद पवार यांचा करणार आहोत, असं म्हटलं आहे. मात्र तब्बल एक दिवस हे बॅनर लावणारे पडद्यामागे होते आणि त्यामुळेच बीडसह महाराष्ट्रात या बॅनरची चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चेवर पडदा पडला आहे.