• Sun. Sep 22nd, 2024

साहेब की दादा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता निवड करावीच लागणार; पुण्यात घडामोडींना वेग

साहेब की दादा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता निवड करावीच लागणार; पुण्यात घडामोडींना वेग

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिवसेना आणि भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या या निर्णयाला शरद पवार यांचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उघड उघड दोन गट पडले. राष्ट्रवादीतील जेष्ठ नेत्यांची एक फळी ही अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिली, तर शरद पवार यांच्यासोबत देखील राष्ट्रवादीतील अनेक नेते ठामपणे आजही उभे आहेत. अशामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नक्की कोणाचा आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या शहरांमध्ये नक्की कार्यकर्ते कुणाच्या बाजूने उभे राहणार यासाठी दोनही नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे.

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहरात शरद पवार गटाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे शहरात शरद पवार यांच्यासोबत आपण आहोत हे दाखवण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ‘मी शरद मित्र’ या नावाखाली सदस्य नोंदणी अभियान सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार बंधनात चव्हाण यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात होणार आहे या अभियानाच्या मार्फत पुणे शहरातील नक्की किती कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे.

अजित पवार शरद पवारांपेक्षा मोठे कधी झाले? ‘दादां’च्या ‘साहेबां’ना कथित ऑफरवर राऊतांचा सवाल

आजचे देशभरातील राजकारण पाहता लोकशाहीच्या रक्षणार्थ अशा कठीण समयी शरद पवार यांच्यासोबत उभे राहणे आपले कर्तव्य आहे. याच विचारास पुढे नेण्याकरिता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी महाअभियान आयोजित केले आहे. ‘मी शरद मित्र’ या नावाखाली अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांना या प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव आपल्या सेवार्थ तत्पर राहिला असून हीच योग्य वेळ आहे, आमच्याशी जोडले जाऊन लोकशाही आणि देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेसाठी उभे राहण्याची. असं या अभियानाचे आयोजक स्वप्निल दुधाने यांनी सांगितला आहे.

दरम्यान, नावाप्रमाणेच या अभियानाचा उद्देश आहे. पुणे शहरात नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे हे चित्र स्पष्ट होत नाही त्यामुळे या अभियानाच्या मार्फत शरद पवारांच्या सोबत नक्की कोण कोण आहेत हे स्पष्ट होईल. हा अशी भूमिका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांनी मांडली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडे जवळपास ८२ टक्के नगरसेवक असल्याचा दावा अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नुकताच केला आहे. त्यानंतर आता शरद पवार गटातील नेते देखील कामाला लागले असून पुणे शहर नक्की कोणाच्या बाजूने हे दाखवण्याची चढाओढ दोन्ही बाजूंकडून होत असल्याचं दिसत आहे.

शरद पवारांना भाजपसोबत आणलंत तरच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, PM मोदींची अजितदादांसमोर अट; वडेट्टीवारांचा दावा

एकीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पुण्यामधील वाढलेला वावर आणि होणाऱ्या बैठका पाहता शरद पवार गटाने अजित पवारांच्या या झंजावाताला उत्तर देण्यासाठी स्वतः शरद पवारांची एक सभा या महिन्याच्या आखरीस आयोजित केली आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता हे मी शरद मित्र या नावाच अभियान सुरू केल्यामुळे शरद पवार यांच्या बाजूने असणारे कार्यकर्ते हे आक्रमकतेने पुणे शहर हे अजूनही शरद पवारांच्या बाजूनेच असल्याचं दाखवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.

नात्यांमधील ओलावा अन् राजकीय धोरणांमध्ये गल्लत नको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed