Nashik News: आरोग्य योजनेच्या कोट्यवधीच्या निधीवर डल्ला मारण्यात आला असून नाशिकच्या तीन रुग्णालयांनी दोन कोटी रुपये लाटले आहेत.
धक्कादायक! खोटो रुग्ण आणि बनावट कागदपत्रे दाखवून ३ रुग्णालयांनी लाटले सरकारचे दोन कोटी रुपये(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी सुरू असलेल्या सरकारी आरोग्य योजनांच्या निधीवर नाशिकमधील तीन रुग्णालयांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचार न करता रुग्णांच्या खोट्या नोंदी, बनावट कागदपत्रे आणि खोटी बिले सादर करून सुमारे दोन कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात तीन रुग्णालयांच्या पाच पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिवांनी दिलेल्या तक्रारीवरून शिव मल्टिस्पेशालिटी व क्रिटिकल केअर रुग्णालय, नाशिक ग्रेस रुग्णालय आणि ऋषिकेश रुग्णालय यांच्या पाच पदाधिकाऱ्यांवर सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच इतर आरोग्य योजनांतर्गत उपचारांची बिले मंजूर करण्याची प्रक्रिया वरळी येथील जीवनदायी भवनातून राबवली जाते. जीवनदायी पोर्टलवर सादर झालेल्या दाव्यांची तपासणी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार नाशिकमधील ३६१ दावे संशयास्पद आढळले.
आरोग्य विभागाच्या तपासणीत प्रत्यक्ष उपचार न देता रुग्णांवर उपचार केल्याचे दाखविणारी खोटी प्रकरणे पोर्टलवर सादर केल्याचे उघड झाले. लाभार्थ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून खोटी माहिती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बिले मंजूर करून घेतल्याचा आरोप आहे. तपासणीत शिव मल्टिस्पेशालिटी व क्रिटिकल केअर रुग्णालयाने १६३ प्रकरणांत ७१ लाख ८३ हजार रुपये, नाशिक ग्रेस रुग्णालयाने १२६ प्रकरणांत ६२ लाख १४ हजार रुपये, तर ऋषिकेश रुग्णालयाने ७२ प्रकरणांत ४५ लाख ४६ हजार रुपयांची बिले मंजूर करून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
उपचाराच्या तारखेपूर्वीच मृत्यू नाशिकमधील देवळा, कळवण आणि दिंडोरी तालुक्यांतील दाव्यांची पडताळणी केली असता काही लाभार्थ्यांनी संबंधित रुग्णालयांऐवजी अन्यत्र उपचार घेतल्याचे आढळले. तसंच काही लाभार्थ्यांनी उपचारच घेतले नसल्याचे, तर काहींचा उपचार दाखविलेल्या तारखेपूर्वीच मृत्यू झाल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा