रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आज दुपारी एका पोत्यामध्ये सुमारे ४० लाख रुपये किमतीचे बेवारस चरस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही पाकिटे भिजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस निरीक्षक आहिरे यांनी दिली. अशाच प्रकारची पाकीटं सौराष्ट्र (गुजरात ) समुद्रकिनारी मिळाले असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.
याबाबत दापोली पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दापोली पोलिसांना मुरुड समुद्रकिनारी एक बेवारस पोते आढळून आल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी त्यांच्या सहकार्यासह मुरुड येथे धाव घेतली. हे पोते उघडून पाहिल्यावर त्यात ११५० ग्रॅम वजनाची १५ पाकिटे आढळून आली.

या पोत्यांमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने दापोली पोलिसांनी जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथक मुरुड येथे दाखल झाले. त्यांनी तपासणी केली असता ते चरस असल्याचे निष्पन्न झाले. पंचासमक्ष पंचनामा करून हे चरस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
आता या सगळ्या धक्कादायक घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. हे अमली पदार्थाचे पोते मुरुड समुद्रकिनारी कसे आले? कोणी आणून टाकले ?अथवा काय या सगळ्याचा तपास आता पोलिस यंत्रणांनी हाती घेतला आहे.