• Sat. Sep 21st, 2024

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गर्दी! दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी, लांबच लांब रांगा

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गर्दी! दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी, लांबच लांब रांगा

लोणावळा, पुणे : स्वातंत्र्य दिनाला लागूल आलेल्या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बोरघाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन ते तीन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या.
Pune News : फक्त पुणे शहरच नाही तर ग्रामीण भागातही मेट्रोची सेवा? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खास प्लॅन
सलग सुट्ट्या आल्यामुळे अनेक पर्यटक लोणावळा आणि खंडाळा येथे फिरण्यासाठी मोठी गर्दी करतात. शनिवार, रविवार सलग सुट्ट्या आल्याने आणि एक दिवस सोडून स्वातंत्र्य दिन असल्याने पर्यटक खास सुट्ट्या काढून या भागात पर्यटनासाठी आले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर सकाळपासूनच मोठी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १२ किमी रांगा; वाहतूक संथ गतीने
लोणावळा परिसरात भूशी धरण, भाजे लेणी, एकवीरा देवी,पवना धरण, राजमाची असे अनेक पर्यटन स्थळं फिरण्यासारखी आहेत. येथे फिरायला येणाऱ्यांमध्ये तरुण – तरुणींची संख्या जास्त असते. तरुण-तरुणी या परिसराला पसंती देतात. त्यामुळे पावसाळ्यात ही ठिकाणं हाऊस फुल्ल असल्याची पाहायला मिळतात.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, चांदणी चौकातील पूल वाहतुकीसाठी खुला होणार

शनिवारीही महामार्गावर १२ किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. आज दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. लांबून येणाऱ्या पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सलग सुट्ट्या आल्यामुळे एक्स्प्रेस-वे जाम झाला आहे. बोरघाटात पावसाची रिमझिम सुरू आहे. गेल्या महिन्यात एक्स्प्रेस-वे वर दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे दरड हटवण्यासाठी एक्स्प्रेस-वे वर काही तासांचा बंदही घेण्यात आला होता. या आठवड्यात सलग सुट्ट्या आल्याने अनेक मुंबईकर नागरिक पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळ्याला पसंती देत आहेत. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed