• Sat. Sep 21st, 2024

घरापासून एक किलोमीटरवर असताना कुटुंब संपलं, आई वडिलांसह लेकीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेनं अनर्थ

घरापासून एक किलोमीटरवर असताना कुटुंब संपलं, आई वडिलांसह लेकीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेनं अनर्थ

चंद्रपूर : चंद्रपूरसाठी आजचा दिवस दुर्दैवी ठरला. ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला. यात तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. ज्या ट्रकच्या धडकेत तिघे ठार झाले त्याच ट्रकने पुढे जाऊन दोघांना परत धडक दिली. त्यामध्ये आणखी दोघे गंभीरित्या जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही घटना जिल्हातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या धोपटाला पेट्रोल पंप जवळ रात्री आठ वाजता घडली. निलेश वैद्य (३२ वर्ष) रुपाली वैद्य (२६ वर्ष), मधू वैद्य (३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. प्रशाद टगराफ (३३ वर्ष) व प्रसाद राजाबाई टगराफ (४० वर्ष) हे दोघे जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.राजुरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गर्दी नियंत्रणात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील धोपटाला येथील गुरुदेव नगर येथे वास्तव्यास असलेले निलेश वैद्य आपल्या पत्नी आणि मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी काम आटपून घरी परत येत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ राजुरा येथून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यात वैद्य परिवाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.याच ट्रकने पुढे जाऊन दोन मोटार सायकलस्वारांना धडक दिली. यात रामपूर येथील दोघेही जखमी झालेत.
दरवाजे तोडून बँकेत प्रवेश; काहीच मिळाले नाही म्हणून मोबाईल चोरला, नंतर पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळतात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.लोकांनी ट्रकचालकाला पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. घटनेची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळगाटून गर्दीला नियंत्रण केले. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.
आता कोकणातही होणार मोठा राजकीय भूकंप?; दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार, आमदार कदम यांचे विधान

शिवारात मदतकार्य, अख्खं गाव जमलं अन् गोलू जिंकलाच; तब्बल ७ तासांनंतर २५० फूट खोल बोअरवेलमधून बाहेर

रस्त्यावर मोठे खड्डे

धोपटाला – सास्ती मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं हा हा मार्ग जीवघेणा ठरला आहे.मागील दोन वर्षापासून राजुरा – रामपुर,धोपटाला – सास्ती मार्गाची अवस्था दयनीय आहे. मार्गाच्या कामाचा प्रश्न घेऊन नागरिकांनी आंदोलने केली आहेत.

मान्सूनचा ब्रेक कधी संपणार? पावसाचं कमबॅक केव्हा? हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस या तारखेपासून पडणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed