• Sat. Sep 21st, 2024

पोहण्यासाठी जाऊ नका, सांगूनही त्यांनी ऐकलं नाही, इंद्रायणी नदीत गेलेली दोन मुले बेपत्ता

पोहण्यासाठी जाऊ नका, सांगूनही त्यांनी ऐकलं नाही, इंद्रायणी नदीत गेलेली दोन मुले बेपत्ता

पिंपरी, पुणे : पिंपरी-चिंचवड हद्दीतील मोशी परिसरात इंद्रायणी नदीमध्ये पोहायला गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. बुडालेले दोघेही अद्याप सापडले नसल्याने त्यांना शोधण्याचे काम अद्यापही सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका ‘अग्निशमन’ ताफ्यात येणार अद्ययावत वाहने; १३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर
शक्तिमान कुमार (वय २० ) सोनू कुमार बैठा (वय २० ) असे दोघांचा बुडून मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. याघटनेमुळे मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारच्या सुमारास हे दोघे जण इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली. इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Pune Metro: पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी ‘पुणे वन कार्ड’; तिकिटासाठी असा होणार कार्डचा फायदा
इंद्रायणी नदीमधून मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा केल्याने या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अद्यापही या बुडालेल्यांचा शोध लागलेला नाही. घटनास्थळावर अग्निशमन दल व एनडीआरएफ टीमकडून शोध कार्य सुरू आहे.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, चांदणी चौकातील पूल वाहतुकीसाठी खुला होणार

हे मुलं ज्यावेळी पोहायला आली त्यावेळी तेथील काही जणांनी त्यांना पोहण्यासाठी जाऊ नका, असे सांगितले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. आणि काही वेळानंतर ही मुले दिसेनाशी झाल्यानंतर संबधित नागरिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed