• Sat. Sep 21st, 2024
जळगाव महापालिकेचा भोंगळ कारभार! गटारीच्या उघड्या चेंबरकडे दुर्लक्ष; अंध वृद्ध महिला पडली अन्…

जळगाव: महापालिकेच्या गलथान कारभारामुळे भिक्षा मागणारी एक अंध वृद्ध महिला गटारीच्या चेंबरमध्ये पडल्याची घटना घडली. स्थानिक लोकांनी अथक प्रयत्न करत या अंध वृद्ध महिलेला दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे ही घटना महापालिकेच्या बाजूलाच असलेल्या गोलांनी मार्केट परिसरात घडली असून गटारीच्या चेंबरवर झाकण नसल्याने ही घटना घडली आहे.
शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास! नदीत विषारी साप; मात्र जिद्द कायम, थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यी…मिळालेल्या माहितीनुसार, भिक्षा मागणारी एक अंध वृद्ध महिला काल गटारीच्या चेंबरमध्ये पडली. प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. महिलेला बाहेर काढण्यास वेळ झाला असता तर कदाचित या ठिकाणच्या घाणेरड्या पाण्यामध्ये तसेच अस्वच्छतेमध्ये गुदमरून या महिलेचा मृत्यू झाला असता. महपालिकेच्या अगदी जवळ असलेल्या उघड्या चेंबरकडे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून महापालिकेच्या गलथान आणि भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दोन वर्षांपासून हा चेंबर अशाच पद्धतीने त्यावर झाकण नसल्याने उघड्या अवस्थेत आहे. त्यामुळे या चेंबरमध्ये आतापर्यंत सात ते आठ नागरिक पडले आहेत. सुदैवाने त्यांना वाचविण्यात यश आले आहे. मोठी दुर्घटना घडण्याच्या आधी या चेंबरवर झाकण बसवावे, तसेच या परिसरातील अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील रस्त्यांसह विविध समस्यांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण केलं होते.

शरद पवार सोलापुरात, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; जेसीबीतून पुष्पवृष्टी

यावेळी मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर नगरसेवकांनी उपोषण मागे घेतले. आयुक्तांनी जळगाव शहरातील समस्या मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले आहे. मात्र महापालिकेच्या इमारतीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावरच अशा पद्धतीने चेंबर उघडे असल्याच्या या घटनेने दिव्याखाली अंधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या इमारती पासून काहीच अंतरावरच जर अशा पद्धतीने चेंबर उघडे आणि अस्वच्छता पसरली असेल, तर इतर ठिकाणची जळगाव शहरातली परिस्थितीचा विचार न केलेला बरा. दरम्यान आता तरी दुर्घटना घडण्याआधी महापालिका प्रशासनाने संबंधित चेंबरवर झाकण बसवावे, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed