• Mon. Nov 25th, 2024
    शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास! नदीत विषारी साप; मात्र जिद्द कायम, थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यी…

    छत्रपती संभाजीनगर: देशातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भिवधानोरा गावातील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. जायकवाडीच्या एक किमी बॅकवॉटर सडलेल्या थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यावेळी थर्माकोलवर अनेक वेळा साप चढतात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
    कौतुकास्पद! गावाचा सर्वांगीण विकास; महिला सरपंचाचा देशात डंका, आता पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या भिवधानोरा गावातील ही परिस्थिती आहे. गावाला लागून जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर आहे. या बॅकवॉटरच्या एक किलोमीटर अंतरावर गावातील विद्यार्थ्यांसाठी शाळा आहे. मात्र जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. गावातील पहिली ते बारावीचे १५ विद्यार्थी जीव मुठीत घालून पाण्यातून प्रवास करतात. पाण्यातून प्रवास करण्यासाठी त्यांना सडलेल्या थर्माकोलचा वापर करावा लागतो. या थर्माकोलवर बसून विद्यार्थी स्वतःच या कठड्यावरून त्या कठड्यावर पोहोचतात.

    बॅकवॉटरच्या पाण्यातून प्रवास करताना मुलांच्या थर्माकोलवर पाण्यात असलेले विषारी साप चढू नये. यासाठी मुले अनेक वेळा काठी घेऊन बसतात. साप दिसल्यास त्याला ते ढकलून देतात. पाण्यातून प्रवास करून त्यांचा प्रवास थांबत नाही तर नदीपात्रातून बाहेर पडताना नदीपात्राच्या परिसरामध्ये असलेले गवतातून त्यांना वाट काढावी लागते. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु अद्यापही अहवाल दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या गावात जाण्यासाठी नऊ कोटी रुपयातून पूल तयार होऊ शकतो.

    कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षपणाचे कौतुक, ऑफिसमध्ये ‘हेल्मेट’ घालून काम करतात सरकारी कर्मचारी

    हा खर्च जलसंपदा विभाग करू शकत नाही. ग्रामविकास विभाग बांधकाम विभाग करू शकतो, असे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं. शाळा शिकून मोठा अधिकारी व्हावा, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मात्र आम्हाला शाळेत जाताना अनेक अडचणी येतात. शाळेमध्ये जाण्यासाठी वाहन तर सोडा रस्त्याने चालण्यासाठी रस्ता देखील नाही आहे. आम्हाला पाण्यातून वाट काढावी लागते. पाण्यातून वाट काढत असताना आम्ही थर्मकोलवरून प्रवास करतो. या प्रवासामध्ये आम्हाला अनेक वेळा सापांचा सामना करावा लागतो. थर्माकोलवर अनेक वेळा साप येतात. मग त्यांना पाण्यात ढकलून द्यावे लागते, असा धक्कादायक अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितला.
    धक्कादायक! एसटीमध्ये चढताना पडली, मागून भरधाव बस आली अन्…; क्षणात गमावले प्राण
    गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. बॅकवॉटरचं पाणी बारा महिने असल्यामुळे या ठिकाणाहून वाट काढताना मुलांना मोठा संघर्ष करावा लागतो. आमची मुलं शाळेत जातात त्यावेळेस आम्हाला ते परत येतील का नाही याबाबत शंका असते. कारण की त्यांना असंख्य संकटांना सामोरे जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed