• Sat. Sep 21st, 2024

विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…

विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…

सांगली : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना फोडून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेसचे कोणाही नेते कोठेही जाणार नाहीत. काँग्रेस मध्ये कोणताही सुप्त संघर्ष नसल्याचे सांगत भाजपच्या सत्तेची हवस कितीवेळ चालणार आहे? इतिहास आहे की सत्तेची हवस जास्त काळ टिकत नाही, अशी जहरी टीका काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली. त्याचबरोबर काँग्रेस हा चौथळलेला वाघ आहे. लवकरच तो झेप घेईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी माजी मंत्री हुसेन दलवाई, विश्वजित कदम काँग्रेस कमिटीमध्ये उपस्थित होते. यावेळी विश्वजित कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कदम म्हणाले, सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला. या ठिकाणी ६० हजार कोटींचा ज्यादा निधी दिला आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांना दहा पटीने निधी देण्याचा नवा पायंडा पाडला जात आहे. मात्र, विरोधी पक्षाच्या आमदारांना तुटपुंजा निधी देण्याचे काम सत्ताधारी करत आहेत.

महाराष्ट्राच्या विकासामध्ये समान हक्क विरोधी पक्षाच्या आमदारांचा आहे. निधीचे समान वाटप करण्याची मागणी अमाची आहे. सरकारची नैतिक जबाबदारी आहे की कोण कुठल्या पक्षाचा आमदार आहे हे न पाहता सर्वांना समान निधी दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले, जतचे आमदार आणि मी आक्रमकपणे पाण्याच्या प्रश्नावर भूमिका मांडली. जत मधील लोक कर्नाटकात जाण्याची मागणी करतात हे लांच्छनास्पद आहे. एकीकडे बेळगाव महाराष्ट्रात येण्याची मागणी करत असताना जत मधील लोक हे कर्नाटकात जाण्याची मागणी करतात हे दुर्दैव आहे.

अजित पवार संतापले; मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे मूर्ख आहोत का?
सत्तेची हवस फारकाळ टिकत नाही : कदम

भाजपने देशात सध्या सत्तेचे राजकरण सुरु केले आहे. गेल्या नऊ वर्षात देशाच्या इतिहासात गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश असे देशातील सात राज्यात सत्तांतर करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. महाराष्ट्रात कोण कोठे जाणार नाही आणि किती लोक घेणार आहेत? सत्तेची हावस किती वेळ चालणार आहे? सत्तेची हवस फारकाळ टिकत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस हा चवथळलेला वाघ : विश्वजित कदम

काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात आगामी काळात चांगले दिवस आहेत. एखाद्या वाघाला बांधून ठेवले तर तो कसा चवथळतो तसा काँग्रेस हा महाराष्ट्रातला चावाथळलेला वाघ आहे. १९९९ साली नेत्यांनी एकजूट करून सर्व जागा निवडून आणल्या. तशीच परिस्थिती आता आहे. सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आहे ही जागा कोणालाही जाणार नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed