• Mon. Nov 25th, 2024
    राज्यात ट्रिपल इंजिन सरकार; भाई जगताप यांची टीका, म्हणाले- स्वार्थासाठी एकत्र आलेल्या नेत्यांना…

    सातारा: दहा वर्षापूर्वी एकमेकांविरोधी आरोप केले होते. ते आज सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत. राजकारण स्वार्थाचे झाले आहे. त्यांना जनता धडा शिकवेल, अशा शब्दात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार आणि सातारा जिल्हा निरीक्षक भाई जगताप यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत सध्याच्या ट्रीपल इंजिन राज्य सरकारबद्दल टीका केली आहे.
    शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास! नदीत विषारी साप; मात्र जिद्द कायम, थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यी…
    महाराष्ट्रातील खोके राजकारणाबद्दल येथील जनता माफ करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुरोगामी हिंदुत्व आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा उल्लेख करत आहेत. आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा अजेंठा सोडलेला नाही. संघर्ष करत आहे. नगर सेवक, आमदार, खासदार कोण? हे निवडून देण्याची प्रक्रिया मतदारांना समजते. त्यामुळे देशात आराजकता असल्याने भाजप नको. बाकी कोणी ही चालेल. अशी मतदारांची मानसिकता बनली आहे, असेही आ. भाई जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रभारी नाना चव्हाण, डॉ सुरेश जाधव, सुरेश शिंदे, उदयसिंह पाटील, जगन्नाथ कुंभार, संदीप चव्हाण, नजिम इनामदार, मनोजकुमार तपासे, बाळासाहेब शिरसाठ, नरेश देसाई, ध्येयशील सुपले, महिला पदाधिकारी अल्पनाताई यादव, उत्तेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

    सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महविकास आघाडी आहे. आम्ही एकत्र निर्णय घेणार आहे. सातारा जिल्ह्यातील निवडणुकीत २० वर्षे हाताचे चिन्ह नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची आहे, अशी स्थिती आहे. अशा वेळी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या गटात खासदार आहेत? हे खा. श्रीनिवास पाटील यांनी सांगावे, अशी मागणी करून आ. भाई जगताप पुढे म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. हा सातारा लोकसभा मतदारसंघातील आढावा घेत आहे. देशातील पत्रकारिता थोडी वाईट आहे. पण महाराष्ट्र राज्यातील पत्रकारिता चांगली कामगिरी करीत आहे.

    शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्याआधीच वाद; युवक अध्यक्ष पदावरून नेत्यांमध्ये वादावादी, व्हिडिओ चर्चेत!

    ते पुढे म्हणाले की, राजकीयदृष्ट्या निवडून दिले आहे. त्याविरोधात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चुकीचे धोरण असेल, तर रस्त्यावर लढले पाहिजे. अस्तित्व दाखवले पाहिजे. आघाडीमुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर अन्याय होत आहे. तरुण वर्ग काँग्रेस सोबत नाही. आताच्या पिढीचा गुगूल गुरू आहे. तरुणाई सोबत घेऊन बुध कमिटी करून चुका दुरुस्त करत आहोत. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तीन हजार सहाशे किलोमीटर होती. ती तीनशे किलोमीटर काश्मीरमध्ये वाढली. गुप्तचर यंत्रणांनी बॉम्ब हल्ला होईल, असे सांगितले. पोलीस सोडून पाळले होते. एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण झाले. भारत जोडताना सफेद पोशाख लाल झाला तरी चालेल असे सांगून राहुल गांधी फिरत होते.
    कौतुकास्पद! गावाचा सर्वांगीण विकास; महिला सरपंचाचा देशात डंका, आता पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार
    भाई जगताप पुढे म्हणाले की, भाजपला लोकांनी आशेने निवडून दिले पण निराशा केली. ४१८ रुपयांचा सिलेंडर ११३५ रुपयांचा झाला. भाजप महिला नेत्यांच्या तोंडावरची माशी हलत नाही. स्मुर्ती इराणी, चित्रा वाघ या महिलेची धिंड काढली तरी रामायणाच्या आणि धर्माच्या गोष्टी सांगतात. विचार पक्का असेल तर कोणाला घाबरायचे? सर्व्हे बाबत कमी बोललेले बरे. स्थानिक पातळीवर झालेला सर्व्हे खरा असतो. काँग्रेस पक्षाच्या विश्वास वाढला आहे. सोशल मीडियावर भाजप पक्ष एका पोस्टला चाळीस पैसे देतात, म्हणून काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा ही आरोप त्यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed