• Sat. Sep 21st, 2024

शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर शिक्कामोर्तब, त्या चर्चा खऱ्या ठरल्या, दिवसभरात काय घडलं?

शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर शिक्कामोर्तब, त्या चर्चा खऱ्या ठरल्या, दिवसभरात काय घडलं?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली आहे. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाली असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील बैठकीला उपस्थित होते. पुण्यातील चांदणी चौकातील कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. तर, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त माजंरी येथे होते. शरद पवार आणि जयंत पाटील मांजरी येथून निघून कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या घरी होते. दुपारी एकनंतर अजित पवारांनी त्यांचा ताफा सोडला आणि त्यांच्या गाडीतून कोरेगाव पार्कमध्ये पोहोचले होते.

शरद पवार यांचा ताफा पावणे पाचच्या सुमारास अतुल चोरडिया यांच्या घराबाहेर पडताना माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील चोरडिया यांच्या घरी असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आजच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे समोर आलं नाही.
भारतीय संघाला पश्चाताप होत असेल, ज्याला संघातून डच्चू दिला त्याने पाहा काय केलं

आजचा घटनाक्रम कसा होता?

शरद पवार हे दुपारी साडेबाराच्या सुमारास मांजरी येथून निघाले आणि सव्वा एकच्या दरम्यान कोरेगाव पार्कला भेटले. अजित पवार एक वाजता चांदणी चौकातील कार्यक्रम संपल्यानंतर चोरडियांच्या घरी पोहोचले. अजित पवारांनी ताफा सर्किट हाऊसला सोडला आणि त्यांची गाडी कोरेगाव पार्कला पोहोचले. दुपारी दोन ते पावणे पाचच्या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा हे येणाऱ्या काळात समोर येईल.

मोठी बातमी, शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा, राष्ट्रवादीत काय घडतंय?
शरद पवार पावणे पाचला अतुल चोरडिया यांच्या घराबाहेर पडले. त्यानंतर अजित पवार घरी आले नसल्याचं अतुल चोरडिया यांनी नाकारलं होतं. मात्र, त्यांनी दिलेली माहिती असत्य असल्याचं समोर आलं आहे. अजित पवार चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडताना माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शरद पवार निघून गेल्यानंतरही जयंत पाटील अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी होते. अजित पवार बाहेर पडण्याच्या अगोदर जयंत पाटील २० मिनिटं निघून गेल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, या भेटीमुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरु आहे हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

अजित पवार संतापले; मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे मुर्ख आहोत का?

शरद पवारांच्या स्वागतासाठी दिलीप वळसे पाटील हजर, मात्र पुण्यात असूनही अजित पवारांची दांडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed