• Sat. Sep 21st, 2024

शारजाहून विमानानं नागपुरात आला, यंत्रणांना टीप मिळाली अन् खेळ खल्लास, १६ लाखांचा ऐवज हाती

शारजाहून विमानानं नागपुरात आला, यंत्रणांना टीप मिळाली अन् खेळ खल्लास, १६ लाखांचा ऐवज हाती

नागपूर : नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान फ्लाइट क्रमांक जी९/४१५, एअर अरेबिया, १० ऑगस्ट रोजी शारजा येथून येणाऱ्या प्रवाशाकडून २८३.८३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. कोणीतरी मोठ्या प्रमाणात सोने घेऊन नागपुरात येत असल्याची गुप्त माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर कस्टम युनिट (एसीयू) आणि एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) च्या पथकांकडून गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली भारतीय पासपोर्ट असलेल्या तरुणाला अटक केली आहे.शमशाद अहमद असे या तस्कराचे नाव असून तो लखनऊचा रहिवासी आहे.
कौतुकास्पद! गावाचा सर्वांगीण विकास; महिला सरपंचाचा देशात डंका, आता पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार
एअर अरेबियाच्या जी९य४१५ या विमानाने शमशाद नागपुरात पोहोचला होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर कस्टम युनिट (एसीयू) आणि एअर इंटेलिजन्स युनिटच्या टीमने तयारी केली आणि तस्कराला पकडण्याची योजना आखली. प्रवाशांच्या चौकशीदरम्यान शमशाद अहमद यांची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तो काहीच बोलला नाही आणि चौकशी दरम्यान टाळाटाळ करत राहिला. त्यानंतर त्याची कसून तपासणी केली असता त्याच्या गुदाशयात सोन्याची पेस्ट सापडली. चौकशीत त्याने २८३.८३. ग्रॅम सोने द्रव स्वरूपात आणल्याचे निष्पन्न झाले.या सोन्याची बाजारातील किंमत १६.६६ लाख रुपये आहे. सीमाशुल्क विभागाने त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
अजित पवार संतापले; मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे मुर्ख आहोत का?
शमशादने खास डिझाइन केलेल्या गुदाशयात सोन्याची पिवळी पेस्ट लपवून ठेवली होती. एका गुप्त माहितीवरून अधिकाऱ्यांनी तरुणाची कसून तपासणी केली असता त्याच्या गुदाशयात सोन्याची पेस्ट सापडली. सोन्याचे भौतिक स्वरूप बदलण्यासाठी त्यात काही रसायने जोडली जातात, ज्यामुळे ते द्रव स्वरुपात होते.कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी प्रवाशाने सोन्याची तस्करी केली आणि विमानतळाबाहेरील एका व्यक्तीकडे ते पोहोचवणार होते. सीमाशुल्क कायदा १९६२ अन्वये नागपूर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, हे सोनं ज्या व्यक्तीकडे जाणार होतं त्या व्यक्तीचा शोध घेण्यात यंत्रणांना यश येणार का हे पाहावं लागेल.

शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर शिक्कामोर्तब, त्या चर्चा खऱ्या ठरल्या, दिवसभरात काय घडलं?

ऑनलाइन गेमच्या नावाखाली फसवणूक, बिझनेस पार्टनरनेच ५८ कोटींना घातला गंडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed