• Mon. Nov 25th, 2024
    महायुतीत नसलेला कोणता नेता आवडतो? फडणवीस म्हणाले, मी तीन नावं सांगेन पण…

    मुंबई : भारतातील आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्था (आयएए) च्या वतीने मुंबईत आयएए लीडरशीप पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी फडणवीसांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. ‘तुमच्या महायुतीत नसलेल्या कोणत्या नेत्याची तुम्ही प्रशंसा करता?’ असा प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस यांनी ‘पॉलिटिकली करेक्ट’ उत्तर देत सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.

    देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलेले राजकीय रॅपिड फायर

    -कोणत्या पक्षासोबत तुम्ही कधीच युती करणार नाही?

    – काँग्रेस… भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

    -काँग्रेसशिवाय कुठल्या (पक्षाच्या) नेत्याशी कधीच युती करणार नाही?

    -राजकारणात आम्ही कधीच शत्रू नसतो, आम्ही राजकीय विरोधक असतो. आम्ही काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधात आहोत. त्यामुळे जो नेता काँग्रेसच्या विचारधारांशी चिकटून आहे, त्यांच्याशी कधीच युती करणार नाही.

    तुमच्या वडिलांनी आणि मी सोबत काम केलंय, मुख्यमंत्र्यांना बाबांचे मित्र भेटले, आपुलकीने गप्पा मारल्या
    -तुमच्या युतीत नसलेल्या कोणत्या नेत्याची तुम्ही प्रशंसा कराल?

    -तसं बघायला गेलं तर बरेच नेते आहेत, पण राजकारणात तुम्ही उघडपणे तसं सांगू शकत नाही. सध्या, जर तुम्ही म्हणालात की या पक्षातील हा नेता उत्तम आहे, तर लगेच तेवढ्या भागाचा व्हिडिओ कापून सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, आणि म्हणतात, बघा देवेंद्र फडणवीस हे माझं किंवा माझ्या नेत्याचं आणि पक्षाचं कौतुक करत आहेत. हे माझ्यासाठी कठीण होऊन जाईल. त्यामुळे आपल्या खाजगी गप्पांमध्ये मी तुम्हाला तीन नेत्यांची नावं सांगेन, ज्यांचं मला कौतुक वाटतं.

    विलासरावाचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न, मग घोटाळ्यामुळे जेलवारी, फडणवीसांना अंगावर घेणाऱ्या गोटेंची कहाणी!

    जर सगळे जण माझ्या पक्षाच्या विरोधात एकत्र येत असतील, तर मी एकटा लढेन असं तुम्हाला म्हणता येत नाही, तुम्हाला गेममध्ये राहूनच लढावं लागेल, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed