• Sat. Sep 21st, 2024

ताई…ही आपली शेवटची भेट; भावाने व्हिडिओ कॉल करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, पण ३ मिनिटात…

ताई…ही आपली शेवटची भेट; भावाने व्हिडिओ कॉल करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, पण ३ मिनिटात…

म. टा. वृत्तसेवा, अमरावती : सुरक्षा दलात कार्यरत असलेला भाऊ सुटीवर घरी आला. आपण हे जग सोडून जात असल्याचे सांगण्यासाठी गुजरातमधील बहिणीला व्हिडिओ कॉल लावला. ‘ही शेवटची भेट आपली’ म्हणून सांगू लागला. बहीण हादरली. अश्रू डोळ्यात आटवून क्षणात सावरली. भावाला वाचवायचे होते. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवतानाच दुसऱ्या फोनवरून पोलिसांना कळविले. तीन मिनिटांत पोलिस घरी पोहचले. तातडीने गळफास काढून रुग्णालयात दाखल केले. त्याचा जीव वाचला.

चित्रपटाचे कथानक वाटावे अशी ही घटना दर्यापूरच्या शांतिनगर परिसरात घडली. सागर पाटील असे या घटनेत जीव वाचलेल्या जवानाचे नाव आहे. सागर जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी दर्यापूरला सुटीवर आले. आल्यापासूनच काहीसे अस्वस्थ दिसत होते. या अस्वस्थतेूनच ९ ऑगस्ट रोजी सकाळी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून गळफास घेण्याची तयारी केली. आपला निर्णय सांगण्यासाठी गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या बहिणीला फोन लावला. व्हिडिओ कॉलवरून आपली ही शेवटची भेट असल्याचे सांगू लागला.

Devendra Fadnavis : महायुतीत नसलेला कोणता नेता आवडतो? फडणवीस म्हणाले, मी तीन नावं सांगेन पण…

दरम्यान, भावाचा टोकाचा निर्णय ऐकूण बहीण हादरली, ती त्याला समजावून सांगू लागली. तोपर्यंत सागरने गळफास घेतला होता. बहिणीने स्वत:ला सावरत दर्यापूर पोलिसांना फोनवरून माहिती दिली. ठाणेदार संतोष ताले, कर्मचारी अनिल आडे, पवन पवार, शरद आडे, दिलीप चव्हाण, अमित वानखडे घटनास्थळी पोहोचले. दार तोडून घरात प्रवेश केला. सागर गळफास घेतलेल्या स्थितीत लटकत होता. त्याचे पाय धरून आधार देत गळफास काढला. सागर बेशुद्ध पडल्याने तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed