• Sat. Sep 21st, 2024
उच्चशिक्षित तरुणांनी तर्र नशेत चोरी केली, CCTV फूटेज पालकांपर्यंत पोहोचले, Video बघताच…

छत्रपती संभाजीनगर : जालन्यातील आयटीआय आणि डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या दोन मित्रांनी दारूच्या नशेमध्ये संभाजीनगरमध्ये कॅनॉट प्लेसमध्ये आले. मौज-मजा करण्यासाठी मोबाईलचे दुकान फोडत चोरी केली. घटनेनंतर चोरी करणाऱ्या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि ते थेट चोरट्यांच्या पालकापर्यंत पोहोचले. मुलांचा प्रताप बघून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी थेट दोघांनाही पोलीस ठाण्यामध्ये हजर केले.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक राजू रिंढे (वय २१) आणि आदित्य सुनील उघडे (वय १९, रा. इंदेवाडी जालना) असे आरोपींची नावं आहेत. अभिषेक आयटीआयचं शिक्षण घेतो. त्याचे वडील कंपनीत नोकरीला आहेत. तर आदित्य हा डी फार्मसीचं शिक्षण घेत आहे. त्याचे वडील कंत्राटदार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्ञानेश्वर खर्डे यांचे कॅनॉटमध्ये रेणुका टेलिकॉम अँड मल्टी सर्व्हिसेस नावाचे मोबाईल दुकान आहे.
ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार; शिंदेंसोबत गेलेल्या आमदाराचा धक्कादायक दावा
दरम्यान, २९ जुलै रोजी नियमितपणे रात्री मोबाईलचे दुकान बंद करून ते घरी गेले. यावेळी दुकानांमध्ये चाळीस हजार रुपये रोकड, दहा स्मार्ट वॉच, दहा येअर बर्ड्स, कीपॅड मोबाईल आणि पाच चार्जर असा तब्बल ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेला. दुकानात चोरी झाल्याप्रकरणी ३० जुलै रोजी सिडको पोलीस ठाण्यामध्ये खर्डे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या चोरीचा सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आणि थेट चोरट्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचला. दुकानांमध्ये चोरी करणारे आपलेच मुलं असल्याचे पालकांच्या लक्षात येताच पालकांना मोठा धक्का बसला. यावेळी दोन्ही मुलांच्या पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली यावेळी मुलांनी चूक झाल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांच्या पालकांनी मुलांना सिडको पोलीस ठाण्यामध्ये हजर केलं.

स्कूटरला उडवलं, कारसोबत फरफटत नेल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पिंपरीत हृदयद्रावक घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed