• Sat. Sep 21st, 2024
वडिलांचा मित्र भेटला, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून गप्पा मारल्या

सातारा : एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी तीन दिवसाच्या मुक्कामासाठी आले आहेत. बांबू लागवडीचा शुभारंभ दरे गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अक्लपे गावात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा आपला ताफा घेऊन दरे या गावी येत असताना त्यांना रस्त्यात उभे असणारे त्यांच्या वडिलांचे वयोवृद्ध मित्र दगडू हरी सुतार भेटले.

त्यांनी तात्काळ ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितली. यावेळी दगडू सुतार यांनी मुख्यमंत्र्यांना हात जोडत तुमचे वडील आणि मी एकत्र काम करीत असल्याचे सांगून मला तुम्हाला पहायचं होतं, असे ते म्हणाले. यावेळी घरातील चौकशी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमचा निरोप वडिलांना नक्की देतो, असे सांगून मुख्यमंत्री आपल्या ताफ्यातून पुन्हा मार्गस्थ झाले. या भेटीतून मुख्यमंत्र्यांची अजूनही सामान्य जनतेशी असणारी नाळ यातून दिसून आली.

बांबू लागवड आणि पर्यटनावर लक्ष केंद्रित करणार

सर्वसामान्य माणूस आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या 6 महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासुन फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल. त्याचबरेाबर पर्यटन वाढीलाही जिल्हृयात चालना देण्यात येईल. त्यादृष्टीने सुक्ष्म आराखडा तयार करुन नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील. पर्यावरणपुरक विकास हे तत्व अंगिकारण्यात येऊन त्यादृष्टीने सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गावकऱ्यांचं गाऱ्हाणं ऐकलं, मुख्यमंत्री शिंदेंनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात नागरिकांच्या समस्या सोडवल्या

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे याठिकाणी मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत संस्थाचे सदस्य पाशा पटेल, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वनसंरक्षक श्रीमती भारद्वाज, सामाजिक वनीकरण विभागाचे वाघमोडे यांच्यासह विविध गावच्या सरपंचांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed