• Mon. Nov 25th, 2024
    मुंबईत आजारांचा ताप वाढला, विवध प्रकारचे आजार फोफावले; शहरातील रुग्णसंख्या धक्कादायक

    मुंबई : मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रो या आजारांचा ताप दिवसेंदिवस वाढत असून एक ते सहा ऑगस्ट या कालावधीमध्येही या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. मलेरियाचे २२६, डेंग्यूचे १५७ रुग्ण या सहा दिवसांत आढळून आले. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भावही वाढता आहे. या आठवड्यात या आजाराच्या ५६ रुग्णांची नोंद झाली.

    मुंबईतील रुग्णसंख्या

    आजार १ ते ६ ऑगस्टदरम्यान जुलै

    मलेरिया – २२६-७२१

    लेप्टो – ७५- ४१३

    डेंग्यू – १५७- ६८५

    गॅस्ट्रो- २०३- १७६७

    कावीळ – ६- १४४

    चिकुनगुनिया- ९- २७

    स्वाइन फ्लू – ५६- १०६

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता CSMTवरुन पहिली फास्ट लोकल इतक्या वाजता सुटणार
    डास मारण्यासाठी केलेली ‘फॉगिंग’ कार्यवाही

    वापरलेल्या फिलिंग मशिनची संख्या – ६,५६५

    धूरफवारणी झालेल्या इमारतींच्या परिसरांची एकूण संख्या – २०,७२९

    धूरफवारणी झालेल्या झोपड्यांची संख्या – २,५३,१२४

    डेंग्यू नियंत्रण

    तपासणी केलेली घरे – ३,५२,४१६

    तपासणी केलेले कंटेनर – ३,७४,३२७

    एडिस डासांच्या उत्पत्तीची स्थाने – ५,११५

    लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंधासाठी सूचना

    साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार ७२ तासांच्या आत रोगप्रतिबंधक उपचार घ्यावे

    पूर किंवा मुसळधार पावसानंतर साचलेल्या पाण्यात जाऊ नये. मुसळधार पावसात अनवाणी चालू नये

    पालिकेची आरोग्य केंद्रे, दवाखाने व रुग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

    सूर्यकुमारच्या तुफानात वेस्ट इंडीज कुठच्या कुठे उडाला, तिसरा T-२० जिंकून भारताचे मालिकेत जबरदस्त पुनरागमन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed