या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्यास नाशिकच्या आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या योगेश अहिरे याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.त्यानुसार कारवाई करत संशयित अहिरे याच्याकडून एक गावठी पिस्तुलासह एक फायर केलेली बुलेट आणि दोन पितळी पुंगळ्या ( खाली केस ) जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित अहिरे याच्या विरुद्ध अग्नीशस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र व हत्यार बाळगणाऱ्या कारवाई करण्यासाठी व शहरातील गुन्हेगारी कमी करण्याच्या हेतूने दरोडा व शस्त्रविरोधी पथक तयार करण्यात आले होते या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईने शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक शहरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणाऱ्या व्यक्ती आणि गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरीता दरोडा आणि शस्त्र विरोधी पथक तयार करून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) सिताराम कोल्हे नाशिक शहर यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणा-या गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) , सिताराम कोल्हे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा आणि शस्त्र विरोधीपथक मधील सहायक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे आणि पोलीस दलातील कर्मचारी विजयकुमार सुर्यवंशी, महेश खंडबहाले, तेजस मते, भरत राउत, युवराज गायकवाड, सागर बोधले, मनिषा कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.