• Sun. Sep 22nd, 2024

नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी भोस्ते पूल आणि जगबुडी नदीचा संदर्भ? पर्स, मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांची शर्थ

नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी भोस्ते पूल आणि जगबुडी नदीचा संदर्भ? पर्स, मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांची शर्थ

रत्नागिरी, चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलीस आजही जगबुडी नदी परिसरात चार बोटी आणि ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने तिची बॅग व मोबाइलचा शोध घेत आहेत. यासाठी ५० ते ६० कर्मचारी जगबुडी नदी परिसरात या सगळ्याचा शोध घेत आहेत. तसेच नीलिमा चव्हाण ही ज्या दिवशी बेपत्ता झाली त्या एक दोन दिवस आधी तिने आपल्याला जगायचे नाही, अशा स्वरूपाचे निराशाजनक व्हाट्सअप चाट केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या सगळ्या विषयात वरिष्ठ पोलीस अधिकारी नीलिमा चव्हाण हीच्या नातेवाईकांजवळ चर्चा करून तपासाची माहिती देणार आहेत.
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, डोक्यावर केस नाही, भुवया नव्हत्या, गूढ वाढले
नीलिमा चव्हाण प्रकरणात आजवर १०० हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. नीलिमाच्या मृत्यू प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे आल्याची माहिती आहे. याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून चव्हाण कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना दिली जाणार आहे. त्यामुळे नीलिमाची बॅग आणि मोबाइल या दोन महत्त्वाच्या वस्तू मिळवण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
Ratnagiri News: रत्नागिरीतील तरुणीच्या मृत्यूचं गूढ वाढलं; केस,भुवया नसलेला मृतदेह सापडल्याने पोलीस बुचकाळ्यात
नीलिमा चव्हाण ही जुन्या बंद असलेल्या भोस्ते पुलावरून चालत गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. बॅग ठेवल्यानंतर नीलिमा चव्हाण नेमकी कुणीकडे गायब झाली? याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणे नाकाजवळील जुना वाहतुकीसाठी बंद असलेला भोस्ते पूल परीसरात निलीमाच्या मृत्यूचे गूढ दडले असण्याची प्राथमिक शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तपास सुरू आहे.
मी गावी जाते आहे हे शब्द अखेरचे ठरले, बेपत्ता २४ वर्षीय युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
वैद्यकीय अहवालात नेमकं काय आहे? याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र पोलिसांकडूनच हा तपशील तपास पूर्ण झाल्यानंतर सांगितला जाण्याची शक्यता आहे. नीलिमा चव्हाणचा मृतदेह दाभोळ खाडीत मिळाला. त्याच वेळी तिच्या डोक्यावर आणि भुवयांवर केस नव्हते. यामुळेच या सगळ्या प्रकरणातला संशय वाढल होता.

मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर आणि टेम्पोचा भोस्ते घाटात अपघात, ३ जण जखमी

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलिसांचा तपास हा जगबुडी नदी व जुना भोस्ते पूल परिसर यावर केंद्रीत करण्यात आला आहे. तसेच सगळ्याच बाजूने पोलीस यंत्रणा तपास करत आहेत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण आठ पोलिसांची पथके याचा तपास करत आहेत. निलिमाच्या नातेवाईकांकडून चिपळूण पोलिसांनी सहकार्य न केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करतानाही या तपासात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चिपळूण पोलिसांकडे चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात नीलिमा खेड चिपळूण एसटीत ज्यावेळी बसली त्यावेळी ज्या तरुणाला भेटली तो तरुण हा तिच्या मैत्रिणीचा पती होता. आणि मैत्रीण व तिचा पती दोघेही तिला अचानक योगायोगाने भेटले होते. त्यामुळे तूर्तास तरी या सगळ्या प्रकरणात कोणताच संबंध नसल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed