सांगली: जिल्ह्यातील मांगले येथील तुषार गणपती पांढरबळे (२४, मुळ गाव-बिळाशी) सध्या राहणार मांगले (ता शिराळा) याने वारणा नदीवरील मांगले – सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात उडी मारण्याची घटना काल घडली आहे. आजही वारणा नदीपात्रात त्याचा शोध NDRF ची टीम घेत आहे. तुषार गणपती पांढरबळे हा मूळचा बिळाशी गावचा असून मांगले येथे आजोळी आईसह रहात होता. त्याने शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वारणा नदीवरील मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून मोबाईलवरुन व्हिडिओ कॉलवर बोलत बोलत उडी घेतली होती.
यावेळी तेथे मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्यांना न जुमानता पाण्यात उडी मारली. दरम्यान नदी पात्रात उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करू नको. मी कुठेही सापडणार नाही, तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही. असा मजकूर ठेवला आहे. तुषार हा शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास मांगले – सावर्डे बंधाऱ्याकडे गेला.

बंधाऱ्यावर बराच वेळ मोबाईलवर बोलत होता. मी उडी घेतोय’ असे बंधाऱ्याच्या काठावर जाऊन त्याचे बोलणे सुरू होते. त्यावेळी त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने स्वताला पाण्यात झोकून दिले. दरम्यान सध्या वारणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला. वारणा नदीचे पात्र मोठे विस्तीर्ण आहे. त्यामुळे तुषारला शोधणे अवघड झाले आहे. आज दिवसभर एनडीआरएफ टीममार्फत तुषारचा शोध सुरू आहे.