अमरावती: मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने रविवारी पहाटे स्वतःला चाकू मारुन संपविलं. पत्नीने धाव घेतली असता ती सुद्धा जखमी झाली आहे. घरातील सर्वांनी धाव घेऊन मानसिक रुग्णाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. ही धक्कादायक घटना बडनेरा पोलिस स्टेशन हद्दीतील निंभोरा येथे ६ ऑगस्ट रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. मानसिक आजाराने त्रस्त असल्याने मृतक उपचार घेण्यासाठी वर्धा येथून अमरावती शहरात त्याच्या बहिणीकडे आला होता.
मानसिक आजाराने त्रस्त असल्याने देवळी वर्धा येथे राहणारा ३६ वर्षीय भूषण रमेश भगत उपचार घेण्यासाठी कुटुंबासह अमरावती शहरातील बडनेरा मार्गावरील निंभोरा येथे शनिवारी रात्री ८ वाजता आले होते. त्यांच्या सोबत त्यांची आई, पत्नी आणि दोन मुलं त्यांचे जावई सुरेश जाधव यांच्याकडे आले होते. दुसऱ्या दिवशी बहीण त्यांना दवाखान्यात उपचाराला घेऊन जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच अनर्थ घडला.

अशात घरातील सर्वजण गाढ झोपले होते. मात्र, भूषण भगत हे रात्रभर न झोपता घरात चकरा मारत होते. त्यानंतर पहाटे ५ वाजताच्या दरम्यान भूषणने घरातील सूरी हातात घेऊन त्याने गळ्यावर अचानक वार करण्यास सुरुवात केली. इतक्यात पत्नीला जग आली, पती स्वत:वर वार करत असल्याचं पाहून पत्नी धावून गेली आणि तिने त्यांच्या हातून सूरी हिसकण्याचा प्रयत्न केला असता तिला सुद्धा सूरी लागून ती जखमी झाली आहे.
आरडाओरड ऐकून घरातले सारे जागे झाले. घरातील सर्व सद्यस्य जागे झाल्यानंतर त्यांनी भूषण भगतला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. बडनेरा पोलिसांनी पंचनामा करून हे प्रकरण वर्ग केले आहे. मृतक भूषण भगत याने याआधी सुद्धा स्वतःला जखमी केले होते, अशी माहिती बडनेरा पोलिसांनी दिली आहे.