म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासारख्यांनी ऑनलाइन गेमची केलेली जाहिरात चुकीची व अशोभनीय आहे’, अशी नाराजी प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. ही जाहिरात बंद करण्यासाठी राज्य सरकारने नोटीस बजवावी’, अशी मागणीही त्यांनी केली.
‘जास्त खेळू नका, जास्त पैसे लावू नका, सूचना देऊन विष देण्याचा हा प्रयत्न आहे. सचिन तेंडुलकर यांनी अशी जाहिरात करू नये’, असे आवाहनही बच्चू कडू यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.
‘जास्त खेळू नका, जास्त पैसे लावू नका, सूचना देऊन विष देण्याचा हा प्रयत्न आहे. सचिन तेंडुलकर यांनी अशी जाहिरात करू नये’, असे आवाहनही बच्चू कडू यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने सत्तेत सहभागी होताच नवीन सहकाऱ्यांना संधी देण्यात आली. शिवसेनेतील बंडापासून सोबत असणारे अजूनही प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ‘आता विस्ताराचा फायदा नाही’, असा तीव्र संताप व्यक्त केला. विस्तार होत असल्यास त्यादिवशी अमेरिका नाही तर, अन्य देशात जाईल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
‘मंत्रिमंडळात सद्यस्थितीत सहभागी होण्याची गरज नाही. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक झाल्यास आचारसंहिता लागेल. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळीही तशीच स्थिती राहील. पाच-सात महिने असताना सरकारने विस्तारात कशाला डोके घालावे’, असा टोलाही बच्चू कडू यांनी कुणाचे नाव न घेता लगावला.