• Mon. Sep 14th, 2026
आईसह ३ वर्षांचा चिमुकला तळ्यात बुडाला; मायलेकाच्या मृत्यूने परिसर हळहळला!

सांगली : जत शहरातील विठ्ठलनगर परिसरातील आदाटे वस्तीच्या जवळ शेत तलावातील पाण्यात बुडून माय-लेकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली आहे. विवाहिता मिनाक्षी चंद्रकांत माने (वय २७) आणि मुलगा अलोक चंद्रकांत माने (वय ३) अशी मृतांची नावे असून याबाबत जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील विठ्ठलनगर परिसरातील आदाटे वस्ती नजीक चंद्रकांत माने हे आई, वडील ,पत्नी व मुलासह शेतात राहतात. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पत्नी मिनाक्षी व मुलगा अलोक घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेत तलावात पडले. पोहता येत नसल्याने दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी हजर झाले.

Rahul Gandhi : राहुल गांधींचं लोकसभेत कमबॅक ते इंडिया आघाडीला बळ,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा असा होणार परिणाम

माय-लेकाचे मृतदेह शेत तलावातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले. जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेने परिससरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed