• Sat. Sep 21st, 2024
ना एनडीए, ना मविआ, राजू शेट्टींचं ठरलं, महाराष्ट्रात नवा राजकीय प्रयोग

कोल्हापूर: देशात भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. एनडीए विरुद्ध इंडिया असे समीकरण सध्या देशात होत असून यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठका सध्या सुरू आहेत. अशातच आता राज्यात एनडीए आणि मविआ मध्ये नसलेले छोटे पक्ष एकत्र येत असून प्रागतिक विचार मंचची स्थापना करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. प्रस्थापित पक्ष छोट्या पक्षांना जुमानत नसल्याने अनेक छोटे पक्ष एकत्र आले असून राज्यात छोट्या पक्षांची नवी आघाडी तयार करण्यात आली आहे. या प्रागतिक विचार मंचाची बैठक लवकरच कोल्हापुरात होणार असल्याचे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सांगितले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा वेगळेच डोहाळे :

२०१९ मध्ये राज्यात भाजप विरोधात एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना झाली. महाविकास आघाडी तयार होत असताना या निर्मितीमध्ये छोट्या पक्षांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, सरकार स्थापन झाल्या नंतर सरकार मधले जे प्रस्थापित पक्ष होते त्यानी छोटा पक्षांकडे कानाडोळा केला. यामुळे आम्हाला महाविकास आघाडीचा अनुभव अतिशय वाईट आला. सत्ता प्राप्त होतात महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा वेगळेच डोहाळे लागले. केवळ सत्तेवरचे चेहरे बदलण्यासाठी सत्ता आम्हाला नको होत तर सत्ते बरोबरच व्यवस्था परिवर्तन करू शकेल असं सरकार आम्हाला हवा आहे. शिवाय भाजप व एनडीए कडून सुरू असलेल राजकारण हे अत्यंत वाईट असून भाजप फोडा आणि जोडा पद्धतीचे आणि धार्मिक तेढ निर्माण करत जे राजकारण सुरू केलं आहे याला आमचा विरोध आहेत, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
Success Story: सर्वसाधारण मजुराचा मुलगा, क्रिप्टोकरन्सीने उजळले नशीब अन् बनला भारताचा पहिला क्रिप्टो अब्जाधीश

प्रस्थापित पक्ष छोट्या पक्षांना जुमानत नसल्याने अनेक छोटे पक्ष आले एकत्र :

राज्यातील असलेले मोठे प्रस्थापित पक्ष हे आपल्या मूळ विचारधारेपासून लांब जात असून या पक्षातील नेत्यांमध्ये स्वार्थ मोठ्या प्रमाणात बरबटलेला आहे यामुळे पक्ष फुटत आहेत. शिवाय हे पक्ष लोकांपासून देखील लांब जात आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसाला जवळचा वाटावा अशी विचारधारा धरून आम्ही सर्व छोटे पक्ष प्रागतिक विकास मंचच्या व्यासपीठाखाली एकत्र आलो आहोत. आमची शक्ती लहान असली तरी आम्ही एकत्र आहोत असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
किल्ल्याजवळची जागा मद्यपानासाठी, शिवप्रेमींचा संताप, हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

या मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, बहुजन विकास पार्टी, शेकाप यासह काही सामाजिक संघटना एकत्र येत असून पुरोगामी विचाराचे आणि प्रगतीक विचाराचे आम्ही सगळे हे छोटे पक्ष आहोत तसेच यामध्ये अजूनही हळूहळू भर पडत चाललेली आहे. शिवाय लवकरच कोल्हापूरमध्ये सुद्धा एक बैठक घेण्यात येणार आहे असे ही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

Sharad Pawar: शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका, नाशिकच्या तरुणाला भाजपच्या मीडिया सेलची जबाबदारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed