• Mon. Sep 14th, 2026
Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढचे २४ तास पावसाचे, मुंबई-पुण्यासह १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबई : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटी मुसळधार पावसाने राज्याला जोडपून काढलं. अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाले तुडुंब भरले आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचंही चित्र होतं. ऑगस्टच्या पहिल्या २ दिवसांत पावसाने दडी मारली आणि यानंतर पुन्हा राज्यात पावसाचा जोरदार पाऊस पाहायला मिळाला. अशात एकंदरीतच संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊस सरासरी पेक्षा कमी होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

असं असलं तरीही आज राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आयएमडी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये आज यलो अलर्ट असणार आहे तर पुणे, सातारा, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस होईल तर इतर भागात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आज पाहायला मिळेल.

हवामान खात्याकडून अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये मात्र कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

गडचिरोलीत पावसाचा कहर, अहेरी-मुलचेरा तालुक्याचा दुसऱ्यांदा संपर्क तुटला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed