घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग व लोणावळा शहर पोलिस, देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्त कंटेनरला ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू झाले आहे.
एक्स्प्रेस वे वरील मुंबई मार्गिका पुन्हा बंद
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर गेल्या काही दिवसांपासून मुंबईकडे जाणारी मार्गिका दरड कोसळल्यानं बंद करण्यात आली होती. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. दरड काढण्यासाठी एमएसआरडीसी आणि प्रशासनानं ट्रॅफिक ब्लॉक घेऊन दरड हटवली होती. त्यानंतर मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरु करण्यात आली होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर जिथं दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाळ्या लावण्याचं काम देखील करण्यात आलं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमाला जाताना आडोशी बोगद्याजवळ थांबून दरड कोसळली होती त्या ठिकाणाची पाहणी केली होती. एकनाथ शिंदे यांनी पुण्याकडे जाताना घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली होती. दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या ठिकाणच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संरक्षण जाळी लावली असून हा परिसर सुरक्षित केला आहे. कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली होती.