• Sun. Sep 22nd, 2024

नागपूर हादरले, मित्रांबरोबर पीत बसला होता, वादानंतर मित्राने तरुणाचा निर्दयीपणे जीव घेतला

नागपूर हादरले, मित्रांबरोबर पीत बसला होता, वादानंतर मित्राने तरुणाचा निर्दयीपणे जीव घेतला

नागपूर : शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात खुनाच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दोन व्यावसायिकांना संपविल्याची घटना ताजी असतानाच शहरात आणखी एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदनवन परिसरातील हिवरीनगर येथे एका तरुणाला निर्दयीपणे संपविण्यात आले. सोमवारी रात्री तरुणाचा त्याचा मित्रांसोबत वाद झाला. हे तिघेही मद्यपान करत होते. या वादाचा शेवट फार वाईट झाला. तुषार किशोर इंगळे (१८, रा. गुजर नगर, गंगाबाई घाट, नागपूर) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदनवन परिसरातील हिवरी नगर येथील संघर्ष नगर रोडवरील दारूच्या भट्टीसमोरील मोकळ्या जागेत मृतक हा त्याच्या काही मित्रांसह दारू पीत होता. दारू पीत असताना सर्व मित्रांमध्ये वाद सुरू झाला. दरम्यान, रागाच्या भरात आरोपींनी तुषारला संपवले. मंगळवारी सकाळी सहा वाजता फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. त्यांनी याची महिती नंदनवन पोलिसांना दिली.

या गावात आई-वडिलांना आपल्या मुलांचे लग्नच करायचे नाही, कारण जाणून कपाळावर हात मारून घ्याल
पोलिसांनी घटनस्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

क्षमता नाही, तर सुंदरता पाहून… आमदार संजय शिरसाटांनी डिवचले, प्रियांका चतुर्वेदींचे प्रत्युत्तर
आईने कामधंदा करण्यास सांगितल्याने तरुणाने संपवले जीवन

आईने काही कामधंदा करायला सांगितल्याने २६ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास घडली. अमित गणेश उईके (२६, रा. सोनी नगर, मरारटोली) असे मृताचे नाव आहे.

धाकट्या भावाच्या मृत्यूचा धक्का थोरल्या भावाला सहन झाला नाही, घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं
अमित २६ वर्षांचा होऊनही बेरोजगार होता. याबाबत अमितची आई सीमा गणेश उईके (५०) यांनी त्याला सांगितले की, तो मोठा झाला आहे, आता कामाला लाग. यामुळे अमित संतापला आणि रागाचाभरात अमितने रविवारी सायंकाळी राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी अंबाझरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विनोद म्हात्रे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed