• Sat. Sep 21st, 2024

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी पवार एकत्र, मोदींनी हात पुढं केला, शरद पवारांनी पाठ थोपटली

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी पवार एकत्र, मोदींनी हात पुढं केला, शरद पवारांनी पाठ थोपटली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रथम शरद पवार आणि अजित पवार देखील मंचावर एकत्र आलेले आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर आले. यावेळी नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात खेळीमेळीचं वातावरण दिसून आले.

मोदींकडून हस्तोंदलनासाठी पुढाकार, शरद पवार यांनी पाठ थोपटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचावरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांची भेट घेतली. मंचावरील शरद पवार यांच्याजवळ आल्यानंतर मोदींनी स्वत: पुढाकार घेत हस्तोंदलन करण्यासाठी हात पुढं केला. यानंतर शरद पवार यांनी देखील प्रतिसाद दिला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी जात असताना शरद पवार यांनी दोनवेळा मोदींची पाठ थोपटली.

‘अशा कमेंट्स तेव्हाच येतात जेव्हा…’ कपिल देव यांच्या विधानावर जडेजा पाहा नेमकं काय म्हणाला

सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीनं भुवया उंचावल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास शरद पवार यांनी उपस्थित राहू नये, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेण्यात आली होती. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून शरद पवार यांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याबद्दल वेगळा विचार करावा, अशी भूमिका घेण्यात येत होती. मात्र, सुशीलकुमार शिंदे आजच्या सोहळ्यास उपस्थित राहिले. त्यामुळं सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा, काँग्रेसचा डबलगेम, बालेकिल्ल्यातून भाजपवर चढाई
दरम्यान, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस उपस्थित आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. या कार्यक्रमाला पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात मेट्रोच्या दोन मार्गांचं लोकार्पण करण्यात येणार आहे.

माझा लेक कुठेय? मुलाला संपवणाऱ्या आईचा सतत एकच सवाल; महिला वेगळ्याच जगात, पोलीस बुचकळ्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed