• Mon. Nov 25th, 2024

    लोकसभेच्या ओपिनियन पोलमध्ये २ जागांचा अंदाज, अजित पवारांचा शिलेदार मैदानात, सर्व्हेचं गणित..

    लोकसभेच्या ओपिनियन पोलमध्ये २ जागांचा अंदाज, अजित पवारांचा शिलेदार मैदानात, सर्व्हेचं गणित..

    पुणे : लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर विविध वाहिन्यांचे मतदानपूर्व चाचण्यांचे अंदाज जाहीर होत आहेत. एका हिंदी वाहिनीनं काल देशभरातील ५४३ जागांचा अंदाज जाहीर केला. लोकसभेच्या ५४३ जागांचा अंदाज जाहीर करताना संबंधित वाहिनीनं महाराष्ट्रात काय स्थिती असेल हे देखील मांडलं. त्यामध्ये भाजपला २०, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २, अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला २, काँग्रेसला ९, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ११ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे समर्थक राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भूमिका मांडली आहे. निवडणूक पूर्व होणारे सर्व्हे यामध्ये कितपत तथ्य आहे? त्यांची विश्वासार्हता किती आहे, असा प्रतिप्रश्न करून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सध्या जे राजकारण सुरू आहे, त्यामध्ये या सर्व्हे ला काहीही महत्त्व नाही, असे उत्तर दिले.
    Crime Diary : ३ मिनिटं ३३ चोर अन् २ अब्ज ७० कोटींचे हिरे गायब, एअरपोर्टवर थरार; घटना वाचून हादराल
    बारामती येथे रविवारी ( दि. ३०) कृषी विभागा मार्फत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. ते पुढे म्हणाले, हे असे सर्व पाहिले की मला माझा जुना पक्ष प्रकर्षाने आठवतो. हा सर्व्हे किती विश्वासार्ह आहे हा खरा प्रश्न आहे. हे सर्व्हे कसे चालतात हे मला चांगले माहिती आहे. सर्व्हे करणारे चॅनल आणि कंपन्या किती लोकांची मते जाणून घेतात. ती संख्या किती असते हा एक मोठा प्रश्न आहे. सहभाग नोंदवणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार सर्व्हेचे निकाल बदलत असतात. त्यामुळे या सर्व्हेंना जास्त महत्त्व देता येत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.
    कोल्हापूरचा पूर कसा ओसरला दीपक केसरकरांनी तर्क लावला, भुजबळ हात जोडत म्हणाले, इकडे या..,धरणं भरुन द्या
    सध्याचे राजकारण सुरू आहे त्या राजकारणामध्ये या सर्व्हेला काहीही महत्त्व नाही, असे देखील मुंडे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रामध्ये एकीकडे पूर परिस्थिती तर दुसरीकडे अवर्षण आणि दुष्काळी स्थिती आहे. याबाबत माध्यम आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना छेडले असता ते म्हणाले, ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे अशा बाधितांना मदत व पुनर्वसन विभाग तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून मदत केली जाईल. याबाबतचा निर्णय झाला आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
    Sharad Pawar : मी, ठाकरे आणि थोरात,आम्ही तिघांनी ठरवलं तर कदाचित महाराष्ट्रात.., शरद पवारांचं सूचक वक्तव्य..

    रोहित पवारांनी अधिवेशन गाजवलं, मोठ्या दादांची जागा धाकल्या दादांनी घेतली !

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed