पालघर : पावसाळ्यात पर्यटन स्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्याजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही. सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावरही बेतला आहे. डहाणूतील सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे ही असाच प्रकार घडला असून सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.
पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला मोठा पूर आलेला आहे. तरी देखील अनेक पर्यटक आसपासच्या परिसरात पर्यटनासाठी येत असतात. डहाणूतील असेच एक दांपत्य हे वाघाडीतील भीम बांध येथे पर्यटनासाठी आले होते. यावेळी एका महिलेला तेथे सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

सेल्फी काढताना घसरला महिलेचा पाय
महिला सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती थेट दगडावरून नदीत कोसळली. त्यानंतर तेथेच असलेले डहाणू पंचायत समिती उपसभापती पिंटू घहला व त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीत उडी मारून नदीच्या प्रवाहात अडलेल्या या महिलेला सुखरूप बाहेर काढले.