• Sat. Sep 21st, 2024

धाकट्या भावाच्या मृत्यूचा धक्का थोरल्या भावाला सहन झाला नाही, घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं

धाकट्या भावाच्या मृत्यूचा धक्का थोरल्या भावाला सहन झाला नाही, घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं

पुणे : सख्खे भाऊ पक्के वैरी असे म्हणतात. तशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना घडल्याने ही म्हण प्रचलित झाली असावी…पण कुटूुंबातील आपलेपणा कधीकधी मनाला चटका लावून जातो. त्यातून मन हेलावणाऱ्या घटना घडतात. आजारी असलेल्या आपल्या लहान भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजताच मोठ्या भावाला ही हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यांचेही निधन झाल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात घडली आहे. या घटनेने भावाबद्दल असणारे प्रेम निशब्द करून टाकते. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..‌

लहान भावाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मोठ्या भावाने ही आपले प्राण सोडले. दोन्ही सख्ख्या भावांचे एक दिवस आड करून निधन झाल्याने कुंजीरवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दशरथ विनायक गायकवाड (वय- ७२ वर्षे) व जयवंत विनायक गायकवाड (वय- ७९ वर्षे) असे निधन झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावे आहेत.

सेल्फीच्या नादात महिला पडली नदीत; डहाणू पंचायत समिती सभापतींनी थेट घेतली उडी आणि…
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ गायकवाड हे आजारी होते. त्यांना एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यावेळी उपचारा दरम्यान त्यांचा बुधवारी (ता. २६) निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती बंधू जयवंत गायकवाड यांनी दिली. गुरुवारी काम करीत असताना अचानक पणे जमिनीवर कोसळले. जयवंत गायकवाड यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ITR भरण्यासाठी शेवटचा १ दिवस बाकी, आयकर विभागाने केली ही मोठी घोषणा, तयार ठेवा ही महत्त्वाची कागदपत्रे
डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. एक दिवसाच्या अंतराने घरातील दोन्ही भाऊ गेल्याने कुटुंबावर दुखांचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार?; राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा, म्हणाले…
दरम्यान, जयवंत गायकवाड व दशरथ गायकवाड हे दोघे ही शेती व्यवसाय करीत होते. दोघांच्या ही पश्चात प्रत्येकी दोन मुले, मुलगी असा मोठा परिवार आहे. दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed